Dhurandhar 2 Worldwide Collection: अरेच्चा, हे काय घडलं? अचानक बदललं ‘धुरंधर 2’चं गणित; 21 व्या दिवशी किती कमावले?

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या कमाईत एकविसाव्या दिवशी लक्षणीय बदल दिसून आला. या चित्रपटाची समीकरणं अचानक बदलत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात किती कमावले आहेत, ते जाणून घ्या..

Dhurandhar 2 Worldwide Collection: अरेच्चा, हे काय घडलं? अचानक बदललं धुरंधर 2चं गणित; 21 व्या दिवशी किती कमावले?
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 1:55 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने भारतात कमाईचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातही हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये रणवीर सिंहच्या या चित्रपटाने 1600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 20 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु 21 व्या दिवशी कमाईच्या गणितात मोठा बदल पहायला मिळाला. प्रदर्शनाच्या एकविसाव्या दिवशी या स्पाय थ्रिलरने जगभरात किती कमाई केली, त्याविषयी जाणून घेऊयात..

रणवीर सिंहचा हा चित्रपट जगभरात हिंदी आणि साऊथच्या मोठमोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मागे टाकत स्वत: सिंहासनावर बसेल अशी अपेक्षा होती. परंतु त्या विक्रमाकडे वाटचाल करणाऱ्या ‘धुरंधर 2’च्या कमाईचा वेग मंदावला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 21 व्या दिवशी (बुधवार) बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’ या वेब साइटने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत ‘धुरंधर 2’ने जगभरात एकूण 1641 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर 21 व्या दिवशी हा चित्रपट फक्त 12.67 कोटी रुपयेच कमावू शकला. कमाईचा हा आकडा इतर दिवसांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत ‘धुरंधर 2’ची जगभरातील कमाई 1653.67 कोटी रुपये इतकी झाली आहे.

‘धुरंधर : द रिव्हेंज’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले असले तरी बुधवारच्या कमाईत घट झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याचं त्याचं स्वप्न भंगताना दिसत आहे. परदेशात 407 कोटींची कमाई करून या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकलं असलं तरी जगभरातील कमाईच्या बाबतीत तो अजूनही ‘बाहुबली 2’, ‘पुष्पा 2’ आणि ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांच्या मागे आहे. या तिन्ही चित्रपटांपैकी प्रभासच्या ‘बाहुबली 2’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला मागे टाकणं अद्यापही थोडंफार शक्य वाटतंय. परंतु आमिर खानच्या ‘दंगल’ला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर विराजमान होणं ‘धुरंधर 2’साठी खूपच आव्हानात्मक असेल. कारण इतके दिवस बॉक्स ऑफिसवर कोणत्याही मोठ्या चित्रपटाने त्याच्याशी टक्कर केली नाही. आता मात्र अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानंतर ‘धुरंधर 2’च्या कमाईत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Follow Us