AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीरच्या ‘धुरंधर’बद्दल करीना कपूर जे म्हणाली ते ऐकून नेटकऱ्यांचा संताप अनावर

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या तुफान यशादरम्यान आता अभिनेत्री करीना कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे. करीनाने या चित्रपटाबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

रणवीरच्या 'धुरंधर'बद्दल करीना कपूर जे म्हणाली ते ऐकून नेटकऱ्यांचा संताप अनावर
Ranveer Singh and Kareena KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 8:38 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: त्सुनामी आणली आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून जबरदस्त मिळाला आहे. बॉलिवूडपासून टॉलिवू़डपर्यंत.. अनेक कलाकार त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत. अशातच अभिनेत्री करीना कपूरच्या प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा आहे. करीनाने ‘धुरंधर’च्या यशाबद्दल जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली की, “‘धुरंधर’ हा चित्रपट फक्त मुख्य अभिनेता रणवीर सिंहचा नाही, तर हा पूर्णपणे एका दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. आजसुद्धा जेव्हा या चित्रपटाचा उल्लेख होतो, तेव्हा त्याला आदित्य धरचा ‘धुरंधर’ असं म्हटलं जातं.”

करीना कपूरच्या या वक्तव्यावर आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आणि या चित्रपटाच्या मागे दिग्दर्शकाची अधिक मेहनत होती, असं म्हटलं. तर काहींनी करीनावर पक्षपातीचा आरोप केला. ‘हिलासुद्धा धुरंधरचं यश पचलं नाही वाटतं. तिने रणवीर सिंहच्या मेहनतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. काहींनी करीनाला टोला लगावत म्हटलंय, ‘मग तर जब वी मेटसुद्धा इम्तियाज अलीचा चित्रपट आहे, करीनाचा नाही. या हिशोबाने रामायणसुद्धा फक्त नितेश तिवारी यांचा चित्रपट आहे, रणबीर कपूरचा नाही.’ अनेकांनी बॉलिवूडमध्ये असलेल्या रणवीर-रणबीर यांच्यातील तुलनेकडे लक्ष वेधलंय. “रणवीरला रणबीरच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटलं जातं, म्हणून ईर्षेतून तिने हे वक्तव्य केलंय”, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

नेटकऱ्यांचे कमेंट्स-

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. यामध्ये रणवीर सिंहने हमजा अली मजारी या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. जसकीरत सिंह रंगी हा भारताचा गुप्तहेर बनून पाकिस्तानमधील ल्यारीमध्ये जातो आणि तिथे हमजा बनून राहू लागतो. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 1600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!