Vijay Wadettiwar | बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेसकडे निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन करून ही मागणी पुन्हा व्यक्त केली.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे प्रयत्न रंगले आणि अखेर काँग्रेसने बारामतीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, “दिल्ली हायकमांडशी चर्चा करून मंजुरी मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्व पक्षांची भावना आणि परिस्थिती लक्षात घेता निवडणूक बिनविरोध व्हावी, या दिशेने आमचे एकमत झाले आहे.”
या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असून बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडणूक निश्चित झाली आहे.
Published on: Apr 09, 2026 12:48 PM
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या