Dhurandhar 2 OTT Release: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार ‘धुरंधर 2’?

Dhurandhar 2 OTT Release: 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीचीही माहिती समोर आली आहे. रणवीर सिंहचा हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पहायला मिळणार, ते जाणून घ्या..

Dhurandhar 2 OTT Release: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार धुरंधर 2?
Ranveer in dhurandhar 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2026 | 4:47 PM

‘धुरंधर 2’ म्हणजेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने 18 मार्च रोजी पेड प्रीव्ह्यूमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आजपासून (19 मार्च) हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये पाहिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या शोपासून प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये गर्दी केली होती. यासोबतच रणवीर सिंहचा हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे स्ट्रीम होणार, हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत.

‘धुरंधर 2’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार?

डिसेंबर 2025 मध्ये ‘धुरंधर’चा पहिला भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला होता. आता या चित्रपटाचा सीक्वेल नेटफ्लिक्सवर नाही तर दुसऱ्या ओटीटीवर येणार आहे. जियो हॉटस्टारवर हा चित्रपट स्ट्रीम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीक्वेलचे डिजिटल राइट्स तब्बल 150 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ही सर्वांत मोठी डील समजली जात आहे.

कोणत्या तारखेला ओटीटीवर येणार?

‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तारीख समोर आली नाही. परंतु इंडस्ट्री ट्रेंड्स आणि पिंकविला, इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतरच्या 45 ते 60 दिवसांच्या आत ओटीटीवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रणवीरचा हा चित्रपट डिजिटलवर येऊ शकतो.

या चित्रपटाच्या पेड प्रीव्हूलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शहरांमधील थिएटर्समध्ये प्रेक्षकांची गर्दी पहायला मिळाली. ‘धुरंधर 2’ने केवळ पेड प्रीव्हूमधूनच तब्बल 43 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. तर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कमाईचा आकडा 100 कोटी पार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. तर पहिल्या भागातील अक्षय खन्ना यामध्ये रेहमान डकैतच्या फ्लॅशबॅक स्टोरीमधून झळकणार आहे.

Follow Us