AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pm Modi Birthday : वडनगर ते वाराणसी : सेवेची एक प्रेरणादायी यात्रा

या सेवा यात्रेत , संपर्क, युवकांचा सहभाग, समाजकल्याण, सांस्कृतिक बांधिलकी आणि सामुदायिक जनसहभाग या विविध पैलूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Pm Modi Birthday : वडनगर ते वाराणसी : सेवेची एक प्रेरणादायी यात्रा
PM MODI SEVA SANKALP ABHIYAAN VADNAGAR TO VARANASI
| Updated on: Sep 20, 2026 | 6:22 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७६ वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात आला. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मोदी यांच्या सेवेला समर्पित सार्वजनिक जीवनाचा गौरव म्हणून त्यांच्या राष्ट्रसेवेला सेवेला समर्पित अशी ही एक अनोखी आणि अशा प्रकारची पहिलीच यात्रा आयोजित करण्यात आहे.या यात्रेसाठी २० पथके, एकच संकल्प – सेवा, आणि एकूण ३५,५०० किलोमीटरचा प्रवास घडणार आहे.

१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत ही २० पथके वडनगर ते वाराणसी आणि वाराणसी ते वडनगर असा प्रवास करीत आहेत. ही केवळ मोटारसायकल यात्रा नसून त्यापेक्षा खूप व्यापक आणि अर्थपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.ही पथके शहरांमधून, जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून आणि गावांमधून प्रवास करत सेवाभावाची प्रेरणा थेट तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत.

ही सेवा यात्री केवळ समुदायांमधून मार्गक्रमण करीत नाहीत, तर प्रत्येक पडावावर थांबून लोकांशी संवाद साधत आहेत आणि स्थानिक गरजांनुसार विविध सेवा उपक्रम राबवत आहेत. तलाव, मंदिरे, शाळा, उद्याने, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. लाभार्थी संवाद, युवा संवाद, ग्रामसभा चर्चा, गोसेवा तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

ही सेवा यात्रा पीएम श्री शाळांमध्ये, सेवा यात्री शाळांचा परिसर स्वयंसेवक स्वच्छ करीत आहेत, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत तसेच पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वितरित करीत आहेत.रुग्णालये, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये ते गरजू व्यक्तींना यात्रेत मदतीचा हात दिला जात आहेत.

विधवांना विविध साहित्य-किट्सचे वितरण या यात्रेत केला जात आहे. या यात्रेत ‘आशा’ कार्यकर्त्यांचा सन्मान केला जात आहे आणि विविध समाजकल्याण उपक्रमांद्वारे समुदायांना एकत्र आणले जात आहे

ही यात्रा संपर्क आणि संवादाचीही यात्रा म्हटली जात आहे. युवा संवाद, ग्रामसभा चर्चा, महिला संवाद आणि लाभार्थी भेटी यांद्वारे लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्या आकांक्षा समजून घेण्याची आणि तळागाळात जनजागृती करण्याची संधी या यात्रेमुळे निर्माण होत आहे. या यात्रेत अववयदानाची महत्व समजावून सांगतिले जात आहे.

अवयवदानाची सामुहिक प्रतिज्ञा घेतली जात असल्यामुळे समाजात दानभावनेला प्रोत्साहन मिळत आहे, तर शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांना वाहिलेल्या श्रद्धांजलीद्वारे समुदायांचा देशाच्या इतिहासाशी आणि त्याच्या वीरांशी भावनिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल