AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी ठाकरे गटाचा संयम संपला, दिशा सालियान प्रकरणावरून थेट इशारा, आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे नसल्यास…

राणे बंधुंनी तर आदित्य ठाकरेंवर थेट आरोप केलेत. दरम्यान, आता याच प्रकरणावर ठाकरे गटातील नेते वरुण सरदेसाई यांनी टीका आणि आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान दिलेय. तुम्ही पुरावे द्या अन्यथा आम्ही जास्त काळ शांत बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावलंय.

शेवटी ठाकरे गटाचा संयम संपला, दिशा सालियान प्रकरणावरून थेट इशारा, आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे नसल्यास...
DISHA SALIAN AND ADITYA THACKERAYImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2026 | 6:23 PM
Share

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरण राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेला आहे. सीबीआयने कोणाचेही नाव न घेता गुन्ह्याची नोंद केलीय. तर दुसरीकडे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मात्र माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. याच आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राणे बंधुंनी तर आदित्य ठाकरेंवर थेट आरोप केलेत. दरम्यान, आता याच प्रकरणावर ठाकरे गटातील नेते वरुण सरदेसाई यांनी टीका आणि आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान दिलेय. तुम्ही पुरावे द्या अन्यथा आम्ही जास्त काळ शांत बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावलंय.

वरूण सरदेसाई नेमकं काय म्हणाले?

जे आरोप करणारे लोक आहेत, त्यांना माझं खुल आव्हान आहे की त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी एक तरी पुरावा द्यावा. एक तरी पुरावा दिला पाहिजे. पुरावे नसतील आणि आरोप केले जात असतील तर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करूच. परंतु आता आम्ही फार काळ शांत बसणार नाही, असा थेट इशाराच वरुण सरदेसाई यांनी दिलाय.

सतीश सालियान यांनी दिली 500 कोटींची नोटीस

दिशा सालियान प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. या आरोपानंतर त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर आपली भूमिका स्पष्ट केली. मी दिशा सालियान यांना ओळखत नाही. मी त्यांना कधीही भेटलेलो नाही, असं त्यांनी त्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं. परंतु त्यानंतर नवा वाद सुरू झाला. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांना 500 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. ही नोटीस देण्यासाठी ते खुद्द मातोश्रीवर निघाले होते. परंतु कलानगराच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना अडवले आणि आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी 500 कोटींच्या दाव्याची नोटीस स्वीकारली. दरम्यान, आता आदित्य ठाकरे या नोटिशीला काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल