Dhurandhar 2: जसकीरतची घरवापसी, आईची भावूक मिठी..; ‘धुरंधर 2’ची अशी हॅपी एंडिंग पाहून नेटकरी खुश!

Dhurandhar 2 Happy Ending: 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाची क्रेझ आता सोशल मीडियावर एका नव्या रुपात पहायला मिळतेय. या चित्रपटाच्या 'हॅपी एंडिंग'चा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा बदललेला शेवट पाहून नेटकरी खुश झाले आहेत.

Dhurandhar 2: जसकीरतची घरवापसी, आईची भावूक मिठी..; धुरंधर 2ची अशी हॅपी एंडिंग पाहून नेटकरी खुश!
रणवीर सिंह (एआय जनरेटेड व्हिडीओतील स्क्रीनशॉट)
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 23, 2026 | 2:59 PM

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाशी प्रेक्षकांच्या इतक्या भावना जोडल्या गेल्या आहेत, की सोशल मीडियावर प्रत्येकजण त्याविषयी काही ना काही पोस्ट करू लागला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट जणू एक इव्हेंटच (कार्यक्रम) बनला आहे. या क्रेझची एक बाजू थिएटरमधल्या गर्दीत पहायला मिळतेय, तर दुसरी बाजू सोशल मीडियावर दिसतेय. जर तुम्ही रील्स पाहत असाल तर ‘धुरंधर 2’मधील महत्त्वाचे सीन्स आतापर्यंत तुमच्यासमोर आलेच असतील. त्यात आता या चित्रपटाच्या शेवटच्या भागाचा म्हणजेच एंडिंगचा व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ‘धुरंधर 2’चा पोस्ट क्लायमॅक्स सीन आहे.

‘धुरंधर 2’ची हॅपी एंडिंग

व्हिडीओमध्ये रणवीर सिंहने साकारलेला जसकीरत सिंह रंगी हा पाकिस्तानात मिशन संपवून भारतातील पंजाबमध्ये परततो. तिथे तो त्याच्या घरासमोर उभार राहतो. आईला पाहून जसकीरतच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. जसकीरतची आईसुद्धा जेव्हा त्याला पाहते, तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर होतात. जसकीरत आईच्या जवळ जाऊन तिला मिठी मारतो आणि दोघंही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. तर दुसरीकडे जसकीरतची बहीण आणि भाचेसुद्धा भावूक होऊन त्याला भेटतात. अशा आनंदी दृश्यांनी या सीनचा शेवट होतो. परंतु ‘धुरंधर 2’ची ही हॅपी एंडिंग खऱ्या चित्रपटाची नाही. हा एक एआय जनरेटेड व्हिडीओ आहे.

पहा व्हिडीओ-

‘धुरंधर 2’ या चित्रपटाचा खरा शेवट इतका आनंददायी नाही. पोस्ट क्लायमॅक्स सीक्वेन्समध्ये जसकीरत त्याच्या घरापर्यंत जातो खरा, परंतु तो लांबूनच त्याच्या आईला, बहिणीला आणि तिच्या मुलांना पाहतो. तो त्यांची भेट घेत नाही. तो नसतानाही कुटुंबीय खुश असल्याचं पाहून तो तिथून निघून जातो. परंतु तो कुठे जातो, हे चित्रपटात दाखवलेलं नाही. त्यामुळे एआयद्वारे का होईना, चित्रपटाचा शेवट आनंदी करावा म्हणून काही नेटकऱ्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. ‘धुरंधर 2’ या चित्रपटातील असे अनेक एआय जनरेटेड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. गेल्या चार दिवसांत ‘धुरंधर 2’ने कमाईचा 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Follow Us