AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या भेटीचा उद्देश काय? बैठकाआधीच खासदार बजरंग सोनवणे यांचं महत्त्वाचं भाष्य

राष्ट्रवादीचे 8 खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. या भेटीच्या उद्देशावर खासदार बजरंग सोनवणे यांनी महत्वाचं भाष्य केलं.

पंतप्रधान मोदींच्या भेटीचा उद्देश काय? बैठकाआधीच खासदार बजरंग सोनवणे यांचं महत्त्वाचं भाष्य
| Updated on: Aug 10, 2026 | 11:13 AM
Share

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. दिल्ली दरबारी 11 वाजता भेट होणार आहे. या भेटीत राष्ट्रवादीचे 8 खासदार हे पंतप्रधान मोदींशी मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे डिलीमिटेशनवरून शरद पवारांचे खासदार एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. परंतु या सर्व चर्चा खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावल्या आहेत. पंतप्रधान मोदींशी मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीआधी खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठवाडा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणी नाही. पाऊस नसल्याने नदीतही पाणी नाही. जवळपास 50 टक्के वेळ पावसाळ्याचा निघून गेला आहे. तरीही अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खास निधीची मागणी करणे आणि चर्चा करणे, हा विषय आहे’.

‘दुसरा विषय म्हणजे बीज आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा विषय असतो. दरवर्षी मिळत असतो. परंतु मागच्या वर्षी मिळाला नाही. मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जाहीर करण्यात आलेले अनुदान मिळालं नाही. मुख्यमंत्र्‍यांनी हे अनुदान जाहीर केले होते. त्यानंतरही अनुदान मिळालं नाही. हे तीन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाच्या मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न आहेत. ही औपचारिक आहे. या भेटीला दुसरा कोणताही अर्थ नाही, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी राजकीय चर्चा फेटाळून लावल्या.

रोहित पवार काय म्हणाले होते?

खासदारांच्या भेटीवर रोहित पवार यांनीही भाष्य केलं. खासदार रोहित पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे खासदार उद्या जाऊन भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन कामे करून घेतील. खासदार शेतकऱ्यांशी संबंधित कामे करून घेतील. त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न आहेत, अशी माहिती पक्षश्रेष्ठींकडून मिळाली आहे’. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार एनडीएच्या विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी