Dhurandhar 2 Plot: मन सुन्न करणारा क्लायमॅक्स; मेजर इक्बाल, बडे साहबचा क्रूर अंत, हमजाचं पुढे काय होणार?

Dhurandhar 2: 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये हमजा अली मजारी शत्रूंशी सूड घेणार आहे. या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल आणि यात कोण कोणाचा सूड घेणार आहे, याबद्दल माहिती देणारी लेखकाची पोस्ट चर्चेत आली आहे.

Dhurandhar 2 Plot: मन सुन्न करणारा क्लायमॅक्स; मेजर इक्बाल, बडे साहबचा क्रूर अंत, हमजाचं पुढे काय होणार?
धुरंधर: द रिव्हेंज
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 10:18 AM

‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ठरला. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक रणवीर सिंहच्या चित्रपटाच्या या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 18 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत पेड प्रीव्ह्यू शोज होते. तर देशभरातील एकूण 12422 प्रीमियर शोजसाठी 42.71 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग झाली होती. जवळपास सर्व शोज हाऊसफुल आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात बरेच प्रश्नसुद्धा आहेत. आदित्य धरने ‘धुरंधर’नंतर दुसऱ्या भागाचं नाव ‘धुरंधर 2’ न ठेवता ‘धुरंधर : द रिव्हेंज’ असं का ठेवलं? रिव्हेंज म्हणजे सूड आणि गोष्ट फक्त सूडाची असेल तर पहिल्याच भागात हमजाने रेहमान डकैतची हत्या करून हा सूड घेतला होता. मग आता या दुसऱ्या भागात नेमकं काय पहायला मिळणार, हमजाची पार्श्वभूमी काय आहे, तो जसकीरत सिंह रंगीपासून हमजा कसा बनला, त्याच्या आयुष्यात असं काय घडलं होतं आणि त्यानंतर ल्यारीमध्ये कोणते बदल होणार.. असे असंख्य प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us