‘पुष्पा 2’चा रेकॉर्ड धोक्यात? फक्त 4 कोटींची गरज, 39 व्या दिवशी ‘धुरंधर’ चित्रपट इतिहास रचणार

39 व्या दिवशी देखील 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. अशातच आता हा चित्रपट मोठा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.

पुष्पा 2चा रेकॉर्ड धोक्यात?  फक्त 4 कोटींची गरज, 39 व्या दिवशी धुरंधर चित्रपट इतिहास रचणार
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 13, 2026 | 1:58 PM

Dhurandhar box office collection : गेल्या एका महिन्यापासून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रटाने काही दिवसांमध्ये प्रचंड कमाई करून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. अशातच आता ‘धुरंधर’ हा चित्रपट आणखी एक इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु असून यामधील अक्षय खन्नाचा डान्स हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या डान्सवर मोठ्या प्रमाणात रील्स तयार करण्यात आले आहे. त्याच्या या ‘धुरंधर’ चित्रपटातील डान्सचे लाखो चाहते झाले आहेत. यामुळे त्याच्या फॉलोअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या डान्सची चर्चा

‘धुरंधर’ चित्रपट प्रदर्शित होताच काही दिवसांमध्ये अक्षय खन्नाचा डान्स चर्चेत आला. बॉलिवूडपासून ते सामान्य लोक देखील त्याच्या डान्सवर फिदा झाले आहेत. अक्षय खन्नाने केलेली डान्स स्टेप ही काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी केली होती. मात्र, त्याच्या या हुक स्टेपचं निर्माते, बॉलिवूड कलाकार देखील मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.

अशातच आता या चित्रपटाबद्दल आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला कब्जा तयार केला आहे. 39 व्या दिवशी देखील हा चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे.

‘धुरंधर’ची कमाई 1300 कोटींच्या घरात

‘धुरंधर’ चित्रपट आता लवकरच इतिहास रचणार आहे. या चित्रपटाने जगभरात 1296 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 1300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. आतापर्यंत या क्लबमध्ये फक्त एका चित्रपटाचे नाव आहे ते म्हणजे ‘दंगल’.

आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाचा आतापर्यंत कोणीही रेकॉर्ड मोडू शकलेले नाही. या चित्रपटाने जगभरात 2059.04 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे ‘पुष्पा 2’ चित्रपट. अशातच आता ‘धुरंधर’ हा चित्रपट 1300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा तिसरा हिंदी चित्रपट ठरणार आहे.

149 रुपयांमध्ये पाहू शकता ‘धुरंधर’ चित्रपट

‘धुरंधर’ चित्रपटाची क्रेझ पाहता निर्मात्यांनी आता चाहत्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रेक्षकांना ‘धुरंधर’ हा चित्रपट फक्त 149 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. याबाबत जिओ स्टुडिओजने त्यांच्या एक्स म्हणजे ट्विटरवर पोस्ट केली आहे.