250 कोटी बजेटच्या या चित्रपटाचा नेटफ्लिक्सवर 24 तासांत रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींची कमाई

थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचल्यानंतर आता ओटीटीवरही 24 तासांत या चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे.

250 कोटी बजेटच्या या चित्रपटाचा नेटफ्लिक्सवर 24 तासांत रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींची कमाई
नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होतोय हा चित्रपट
Image Credit source: Youtube
| Updated on: Feb 01, 2026 | 10:20 AM

तब्बल 250 ते 280 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने ओटीटीवर येताच नवा विक्रम रचला आहे. 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग, कथाकथन, साहसदृश्ये.. या सर्वांचीच जोरदार चर्चा झाली. इतकंच नव्हे तर या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. थिएटरमध्ये धमाका केल्यानंतर हा अॅक्शन ड्रामा आता ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आहे. रणवीर सिंहचा हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

5 डिसेंबर 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 3 तास 25 मिनिटांचा हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी ठरतोय. स्ट्रीम झाल्याच्या अवघ्या 24 तासांच्या आत हा चित्रपट भारतात नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागला. यावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शिक आदित्य धर म्हणाला, “धुरंधरला नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमाकांवर पाहून मला खूपच आनंद झाला आहे. अत्यंत उत्साहाने प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा, याच उद्देशाने त्याची निर्मिती करण्यात आली होती. मग मोठ्या पडद्यावर असो किंवा घरी बसून ओटीटीवर असो.. या चित्रपटाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचा मी आभारी आहे.”

एकीकडे हा चित्रपट पहिल्या स्थानी ट्रेंड होत असला तरी ओटीटी व्हर्जनवर काहींनी नारीज व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या चित्रपटाच्या ओटीटी व्हर्जनबद्दल निराशाजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत लिहिलं की, ओटीटीवर अनकट व्हर्जन येईल अशी अपेक्षा होती, परंतु हा चित्रपट थिएटर व्हर्जनपेक्षा 9 मिनिटांनी कमी आहे. काहींनी अशीही तक्रार केली ही या चित्रपटाचा रंग ओटीटीवर खूपच निस्तेज दिसत आहे. एखाद्या थिएटर रेकॉर्डिंगचा पायरेटेड प्रिंट पाहिल्यासारखं वाटल्याचं प्रेक्षकांनी म्हटलंय. ‘धुरंधर’चा थिएटरमधील रनटाइम 3 तास 34 मिनिटांचा होता, परंतु ओटीटीवर तो फक्त 3 तास 25 मिनिटांचाच आहे. इतकंच नव्हे तर काही संवाददेखील म्यूट करण्यात आले आहेत.

‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत.