Dilip Joshi | जेठालालने घेतला तारक मेहता मालिकेतून ब्रेक, चाहत्यांना मोठा झटका, अखेर कारण आले पुढे

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतंय. या मालिकेचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. मालिकेतील कलाकारांनी फॅन फाॅलोइंगही जबरदस्त आहे.

Dilip Joshi | जेठालालने घेतला तारक मेहता मालिकेतून ब्रेक, चाहत्यांना मोठा झटका, अखेर कारण आले पुढे
| Updated on: Sep 29, 2023 | 5:15 PM

मुंबई : तारक मेहता मालिका गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन (Entertainment) करताना दिसतंय. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचा मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो. इतकेच नाही तर मालिकेत भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फालोइंग (Fan following) ही बघायला मिळते. विशेष बाब म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत जवळपास ही मालिका सर्वांनाच आवडते. मुंबईतील एक सोसायटी या मालिकेत दाखवण्यात आलीये.

गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. धक्कादायक म्हणजे हे आरोप मालिकेत काम केलेल्या कलाकारांकडून केले जात आहेत. यामुळे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून कलाकार हे मालिकेला सतत सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत.

शैलेश लोढा अर्थात तारक मेहता यांनीही असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. मालिकेत जेठालालचे पात्र साकारणारे दिलीप जोशी हे कायमच चर्चेत असतात. दिलीप जोशी यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. मात्र, दिलीप जोशी हे फार काही सोशल मीडियावर सक्रिय दिसत नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते जेठालालच्या भूमिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.

आता नुकताच दिलीप जोशी यांनी आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी हैराण करणारे भाष्य केले. दिलीप जोशी हे आता तारक मेहता मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहेत. यामुळेच त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा ही बघायला मिळतंय.

दिलीप जोशी हे धार्मिक यात्रेला जात असल्याने त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतलाय. धार्मिक यात्रेसाठी दिलीप जोशी हे अबू धाबीला जाणार आहेत. तारक मेहता मालिकेत ते गणेशोत्सवामध्येही दिसणार नाहीत. आता पुढील काही दिवस चाहते हे दिलीप जोशी यांना मिस करताना दिसणार आहेत. दिलीप जोशी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.