पहलगामच्या जखमा ताज्या असतानाच दिलजित दोसांजचा पाकिस्तानी हिरोईनसोबत रोमान्स, नेटकरी तुफान भडकले!

दिलजित दोसांज हा पाकिस्तानी हिरोईनसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्याचा हानिया आमीरोसबत एक चित्रपट येत आहे.

पहलगामच्या जखमा ताज्या असतानाच दिलजित दोसांजचा पाकिस्तानी हिरोईनसोबत रोमान्स, नेटकरी तुफान भडकले!
diljit dosanjh and hania amir
| Updated on: Jun 26, 2025 | 4:27 PM

Diljit Dosanjh And Hania Amir : भारतातील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा लवकरच सरदारजी- 3 हा चित्रपट येणार आहे. येत्या 27 जून रोजी तो प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाचे नवे गाणे प्रदर्शित होताच, त्याच्यावर तुफान टिका केली जात आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला अवघे दोन महिने झालेले असताना तो एका पाकिस्तान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. याच कारणामुळे दिलजित दोसांजवर सडकून टीक केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिलजित दोसांज आणि पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमीर यांचा सरदारजी -3 हा चित्रपट येत्या 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. दोसांजच्या या चित्रपटात पाकिस्तानची अभिनेत्री हानिया आमीर असल्याने त्याचे चाहते चांगलेच संतापले आहेत.या चित्रपटाचे ट्रेलर आणि एक गाणे रिलीज झाल्यानंतर सरदारजी-3 या चित्रपटाला मोठा विरोध होत आहे. दोसांजचा हा चित्रपट बॉयकॉट करावा, अशी मागणी केली जात आहे.

दलजितचा हानिया आमीरसोबत रोमान्स

दिलजितच्या सरदारजी-3 या चित्रपटातील सोनी लगदी हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात दिलजित आणि हानिय आमीर डान्स आणि रोमान्स करताना दिसत आहेत. हे गाणे पाहूनही भारतातील त्याचे चाहते भडकले आहेत. पहलगामचा हल्ला ताजा असताना दिलजीत एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत रामान्स करताना दिसतोय. हे चुकीचे आहे, अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

दिलजित दोसांजची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, दिलजित दोसांज एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसल्यावर सरदारजी-3 या चित्रपटाचा विरोध केला जातोय. हा चित्रपट विदेशात रिलीज होणार असला तरी त्याला बॉयकॉट केले जावे, अशी मागणी होत आहे. त्यानंतर आता दिलजित दोसांजने यावर प्रतिक्रिया दिली. जेव्हा हा चित्रपट तयार झाला, तेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात एवढा तणाव नव्हता. आम्ही या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी महिन्यात केले. तोपर्यंत दोन्ही देशांत सगळं ठीक होतं. आता मात्र स्थिती बिघडली आहे. आता खूप साऱ्या गोष्टी आमच्या हातात नाहीत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट भारतात रिलीज होणार नसल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात निर्मात्यांनी खूप सारे पैसे लावलेले आहेत. भारतात हा चित्रपट रिलीज होणार नसल्यामुळे नुकसान होईल, हे निर्मात्यांना माहिती आहे. मी जेव्हा हा चित्रपट करण्यासाठी करार केला, तेव्हासुद्धा दोन्ही देशांतील संबंध तणावाचे नव्हते. निर्माते या चित्रपटाला विदेशात रिलीज करणार असतील तर मी त्यांना पाठिंबा देतो, अशी भूमिका दिलजित दोसांज याने घेतली आहे.