
मुंबई | बॉलिवूड सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आजही डिंपल मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. डिंपल यांनी ‘पठाण’, फिर ‘तू झूठी मैं मक्कार’ आणि ‘सास बहू और फ्लेमिंगो’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. वयाच्या ६६ व्या वर्षी देखील डिंपल कपाडिया बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याचं सिनेमे चाहत्यांच्या पसंतीस देखील पडत आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने एक मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र डिंपल कपाडिया यांची चर्चा रंगत आहे.
डिंपल कपाडिया म्हणाल्या, ‘बॉलिवूडमध्ये आजही काम करण्यासाठी माझ्या दोन्ही मुली मला प्रोत्साहित करत असतात. आज मी काम करत आहे त्याचं श्रेय फक्त माझ्या मुलींना जातं..नाही तर मी केव्हाच काम सोडून घरी बसली असती.. माझ्या मुलींनी मला समजावलं आणि माझ्यातील काम करण्याचा उत्साह कायम ठेवला.. मी त्यांना सांगितलं देखील हेतं.. मला आता होत नाही. माझी प्रकृती ठिक नसते… तिथे खूप तणाव असतो..’
काम न करण्याचा आईचा निर्णय ऐकल्यानंतर ट्विंकलने आईला काही प्रश्न विचारले एवढंच नाही तर, स्क्रिनवर अद्यापही सक्रिय राहण्यासाठी ट्विंकलने आईला सांगितलं.. पण तरी देखील डिंपल यांच्या मनात अनेक प्रश्न होते. आता स्वतःला असे पडद्यावर का पाहायचे आहे? हे करण्याची काही गरज का आहे? मग ट्विंकल फक्त त्यांच्याकडे बघून म्हणाली, तुला पैशाची गरज आहे का? यावर डिंपल यांनी होकार दिला. पुढे त्यांची मोठी मुलगी म्हणाली तुझी व्हॅनिटी घरी ठेव आणि कामावर जा.
पुढे डिंपल म्हणाल्या, ‘आज मी एखाद्या प्रोजेक्टला नकार दिला तर, लगेच फोन माझ्या छोट्या मुलीला जातो. त्यानंतर ती मला फोन करते… हे सर्व सध्या सुरु आहे.. पण मी आनंदी आहे. कारण दोघांनी माझ्यात या वयात काम करण्याची प्रेरणा निर्माण केली आहे…’
डिंपल कपाडिया यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव ट्विंकल खन्ना आणि लहान मुलीचं रिंकी खन्ना असं आहे. डिंपल कायम मुलाखतींच्या माध्यमातून मुलींबद्दल सांगत असतात. सोशल मीडियावर देखील डिंपल खन्ना कायम सक्रिय असतात…