Divya Drishti | ‘इच्छाधारी नागिन’नंतर आता मालिकेत ‘इच्छाधारी बंदर’ची एण्ट्री; प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात!

दिव्य दृष्टी या मालिकेत सना सैय्यद, न्यारा बॅनर्जी, संगीता घोष, अध्विक महाजन आणि मिश्कत वर्मा यांच्या भूमिका आहेत. कन्नड मालिका 'दिव्य दृष्टी'ला हिंदीत डब करून प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय.

Divya Drishti | इच्छाधारी नागिननंतर आता मालिकेत इच्छाधारी बंदरची एण्ट्री; प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात!
Divya Drishti Serial
Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2023 | 10:50 AM

मुंबई : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि टीआरपीच्या शर्यतीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मालिकांमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट आणले जातात. दररोज काहीतरी नवीन देण्याची मागणी लेखकांनाही अजब प्रयोग करण्यास भाग पाडते. असंच काहीसं ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत सध्या पहायला मिळतंय. आजवर प्रेक्षकांनी इच्छाधारी नागिनवर आधारित अनेक कथा मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिल्या असतील. मात्र आता ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेतून प्रेक्षकांना चक्क इच्छाधारी माकडाचं दर्शन होतंय. मालिकेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

या क्लिपमध्ये अभिनेत्री तिच्या हातातील डमरू वाजवते. डमरूचा आवाज ऐकताच एक व्यक्ती इच्छाधारी माकडाचं रुप घेतो आणि अचानक तो सगळ्यांवर हल्ला करतो. इच्छाधारी माकडाला पाहून सगळेच घाबरून जातात आणि इकडे तिकडे पळू लागतात. सोशल मीडियावरील या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘हे लोक सीरियल नाही तर प्राणीसंग्रहालय बनवत आहेत’, अशी प्रतिक्रिया एकाने दिली. तर ‘माकड सिंहाचा आवाज कसा काढतोय’, असा सवाल दुसरा युजर करतो. ‘स्टार प्लस वाहिनीचं नाव बदलून अॅनिमल प्लॅनेट ठेवलं पाहिजे’, अशीही खिल्ली नेटकऱ्यांनी उडवली.

या मालिकेत इच्छाधारी माकडासोबतच इच्छाधारी मांजरीची एण्ट्री झाली आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच नववधू बनलेल्या मुलीला इच्छाधारी मांजर होताना पाहून नेटकरी भडकले होते. या चित्रविचित्र कथेमुळे मालिकेचे निर्माते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

पहा व्हिडीओ

दिव्य दृष्टी या मालिकेत सना सैय्यद, न्यारा बॅनर्जी, संगीता घोष, अध्विक महाजन आणि मिश्कत वर्मा यांच्या भूमिका आहेत. कन्नड मालिका ‘दिव्य दृष्टी’ला हिंदीत डब करून प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय.