
अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या प्रत्येक अदावर चाहते घायाळ होताना दिसातात. पण प्राजक्ताच्या सौंदर्याचे रहस्य काय? असा प्रश्न सर्वांना पडला असेल.

प्राजक्ताने नुकताच एका मुलाखतीमध्ये तिचे ब्युटी सिक्रेट सांगितले आहे. 'त्वचेचे ७ थर असतात. त्यामुळे तुम्ही चेहऱ्याला ज्या वरून क्रिम लावता त्या फार फार तर ४ लेअरपर्यंत जातात. त्यामुळे तुम्ही उत्तर आहार घेणेदेखील महत्त्वाचे असते' असे ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली, 'मी कोल्ड ड्रिंक्स, सोडा, मैद्याचे पदार्थ फार कमी खाते. जेवढं आपण खातो तेवढी आपली हालचाल व्हायला हवी. मी सकाळी उठल्यावर रोज एक चमचा तूप खाते आणि पाणी पिते. मी मांसाहार करत नाही. हळूहळू मी व्हिगन व्हायचा प्रयत्न करत आहे.'

'मी दूध किंवा दूग्धजन्य पदार्ख कमी केले आहेत. आपल्या देशात जे पिकतं आपण तेच खाल्ल पाहिजे. गहू आपल्याकडे पिकत नाही त्यामुळे आपण भाकरी खाल्ली पाहिजे. ताक, कोशिंबीरीचा आहारात समावेश केला पाहिजे. राजी ८ नंतर मी कधीच जेवत नाही. रात्री भूक लागली तर मी ड्रायफ्रूट किंवा राजगिऱ्याचा लाडू खाते.'

प्राजक्ता रोज सकाळी उठल्यावर योग आणि प्राणायम करते. तसेच चेहऱ्यावर केवळ टोनर लावते. तसेच रात्री झोपताना ती नाईट क्रिमचा वापर करते.