दाऊद इब्राहिम याच्या लेकीला पाहिल्यानंतर बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींना विसराल, फोटो पाहून म्हणाल…

Don Dawood Ibrahim Daughter : दाऊद इब्राहिम याचंब बॉलिवूडसोबत खास कनेक्शन... कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या लेकीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल, फोटो पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र दाऊद इब्राहिम याच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा...

दाऊद इब्राहिम याच्या लेकीला पाहिल्यानंतर बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींना विसराल, फोटो पाहून म्हणाल...
जावेद मियांदाद आणि दाऊद इब्राहिम एकमेकांचे समधी आहेत. 2009 साली दाऊदची मुलगी महजबींचं लग्न जावेद मियांदादच्या मुलाशी झालं होतं. आता जावेद मियांदाद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर कुठेही जाण्यास परवानगी नाहीये. तसंच त्यांच्या घराबाहेर सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 9:18 AM

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची दहशत होती. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचं नाव देखील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडण्यात आलं. गुन्हेगारीच्या जगात आपलं नाव कमावलेल्या मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don dawood ibrahim) याचं खासगी आयुष्य कायम चर्चेत असते. 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असलेल्या दाऊद इब्राहिमचा भारत अनेक वर्षांपासून शोध घेत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानात लपून बसल्याची माहिती देखील अनेकदा समोर आली. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय दाऊद इब्राहिम याला मदत करते अशी माहिती देखील समोर आली.

अनेक बॉलिवूड कलाकारांना धमकावणारा दाऊद इब्राहिम सध्या त्याच्या लेकीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दाऊद इब्राहिम यांच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे. दाऊद इब्राहिम याची लेत माहरुख हिचा एक फोटो स़ध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. माहरुख हिच्या लग्नाचा फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

दाऊद इब्राहिम याच्या पत्नीचं नाव मेहजबीन उर्फ ​​जुबिना जरीना आहे. दाऊदच्या मुलाचं नाव मोईन इब्राहिम आहे तर मोठ्या मुलीचे नाव माहरुख आणि लहान मुलीचं नाव महरीन आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैद मियांदादसोबत दाऊत याची मोठी मुलगी माहरुख हिचं लग्न झालं आहे.

हे सुद्धा वाचा

जुनैद आणि माहरुख यांचं लग्न 2006 मध्ये झालं होतं. दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये माहरुख हिचा विवाह सोहळा पार पडला. माहरुख हिच्या लग्नादरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये ती पूर्णपणे दागिन्यांमध्ये दिसत होती. सध्या दाऊद इब्राहिम याची लेक आणि जावयाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिम याची लेक माहरुख आणि जावई जुनैद प्रचंड रॉयल आयुष्य जगत आहेत. एवढंच नाही तर, दाऊद याने त्याच्या संपत्तीमधील काही भाग मुलगी आणि जावयाच्या नावावर केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दाऊद इब्राहिम आणि त्याच्या लेकीची चर्चा रंगली आहे.

दाऊद इब्राहिम आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री

गुन्हेगारी विश्वात ज्याप्रकारे दाऊद इब्राहिम याने नाव कमावलं, त्याचप्रमाणे डॉन त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला. अनेक सुंदर मुलींसोबत डॉनचे संबंध होते. या यादीमध्ये बॉलिवूडच्या चार प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. डॉनसोबत नाव जोडल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आल्या. मंदाकिनी, अनिता अयूब, महविश हयात, सुजाता यांच्यासोबत दाऊद इब्राहिम यांचे संबंध होते. आजही डॉनच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

Non Stop LIVE Update
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल.
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव.
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?.
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल.
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक.
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट.
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?.