AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉन दाऊदच्या खास माणसाचा गेम, दिल्ली एअरपोर्टवर पोलिसांनी…ऑपरेशन थेट सक्सेसफुल

दाऊद इब्राहिमचा कुख्यात हस्तक अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. इंटरपोलच्या वाँटेड यादीतील मर्चंट 2023 मधील काशिमीरा बेकरी गोळीबार प्रकरणी फरार होता. खंडणीसाठी हा हल्ला झाला होता. तीन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. आता त्याला मुंबईत आणून पुढील चौकशी केली जाईल.

डॉन दाऊदच्या खास माणसाचा गेम, दिल्ली एअरपोर्टवर पोलिसांनी...ऑपरेशन थेट सक्सेसफुल
दाऊदचा हस्तक अख्तर मर्चंटला अटक
| Updated on: Aug 17, 2026 | 7:26 PM
Share

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात दाऊद इब्राहिम याचा खास मानला जाणार हस्तक आणि इंटरपोलचा वाँटेड गुंड अख्तर मर्चंट याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मर्चंट हा गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. 2023 साली काशीमीरा येथील बेकरीवर गोळीबार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, याच प्रकरणात तो वाँटेड होता. इंटरपोलच्या वाँटेड लिस्टमध्येही त्याच्या नावाचा समावेश होता. इंटरपोलच्या सूचननेनुसार, पोलिसांनी दिल्ली एअरपोर्टवरून त्याला बेड्या ठोकत अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अख्तर मर्चंट हा परदेशातून भारतात येत होता, तेव्हाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याचे समजते.

मुंबईतील काशीमीर पोलिस हे 2023 सालापासूनच आरोपी अख्तर मर्चंटच्या शोधात होते. खंडणी उकळणे आणि गोळीबार करणे असे आरोप त्याच्यावर आहेत. दिल्ली विमातळावर अटक केल्यानंतर आता अख्तरला मुंबईत आणण्यात येणार आहे.

पप्पू पेजरचाही समावेश, गेल्या वर्षी अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 साली काशीमीरा भागातील ‘इंटरनॅशनल बेकरी’वर झालेल्या गोळीबार प्रकरणात अख्तर मर्चंट आणि पप्पू पेजर हे दोघे मुख्य सूत्रधार होते. क्राईम ब्रांचने गेल्या वर्षीच पप्पू पेजरला अटक केली होती, मात्र अख्तर मर्चंट हा तर तेव्हापासूनच फरार होता. मीरा रोडच्या काशीमीरा भागात राहणाऱ्या बाबू नावाच्या गुटखा विक्रेत्याकडून खंडणी उकळण्यासाठी त्याला फोन करण्यात आला होता अशी माहिती तपासात समोर आली होती.

खंडणी दिली नाही म्हणून बेकरीवर गोळीबार

मात्र खंडणी न दिल्याने बाबू याच्या बेकरीवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी काशीमीरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 307, 384, 120(B), 34 अन्वये, तसेच आर्म्स ॲक्ट आणि मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई सुरू केली.

इंटरपोलकडून मिळाली होती अख्तरबद्दल खबर

गोळीबारानंतर अख्तर मर्चंट फरार होता. इंटरपोलच्या संकेतस्थळावरील ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांच्या यादीत अख्तर मर्चंटचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे . तो परदेशात आहे अशी ठोस माहिती, इंटरपोलमार्फत मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस दलाच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर, दिल्ली विमानतळावर त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं आणि परदेशातून त्याने भारतात पहिलं पाऊल टाकताच मर्चंटला बेड्या ठोकून अटक करण्यात आली. दिल्लीतील अटकेनंतर अख्तर मर्चंटला उद्या मीरा-भाईंदर येथे आणलं जाईल, तिथेच पोलीसांकडून त्याची कसून चौकशी केली जाईल.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा