दूरदर्शनने पहिल्याच शोमध्ये केलं रिजेक्ट; नंतर बनली सुपरस्टार, प्रेक्षक चित्रपटासाठी होतात वेडे, या अभिनेत्रीला ओळखलत का?

पहिल्याच शोमध्ये दूरर्दशने रिजेक्ट केलं होतं, मात्र त्यानंतर या अभिनेत्रीचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. एक काळ असा होता की चित्रपटासाठी लोक वेडे व्हायचे, चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागायच्या

दूरदर्शनने पहिल्याच शोमध्ये केलं रिजेक्ट; नंतर बनली सुपरस्टार, प्रेक्षक चित्रपटासाठी होतात वेडे, या अभिनेत्रीला ओळखलत का?
Madhuri Dixit
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 4:44 PM

जेव्हा-जेव्हा धक धक गर्लचा उल्लेख होतो, तेव्हा-तेव्हा चित्रपट प्रेक्षकांसमोर माधुरी दीक्षितचा चेहरा समोर येतो. अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या चित्रपट करिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. आजही लोक तिच्या चित्रपटासाठी वेडे होतात. एक काळ असाही होता माधुरी दीक्षितीचा चित्रपट पहाण्यासाठी दर्शक चित्रपट गृहाबाहेर रांगा लावायचे. माधुरी दीक्षित उत्तम नृत्य देखील करते, खूप थोड्या लोकांना हे माहिती असेल की तिने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी नृत्याला सुरुवात केली होती. 9 व्या वर्षी तिला स्कॉररशिप देखील मिळाली होती. माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 साली मुंबईमध्ये झाला. माधुरी दीक्षितला लहाणपणापासूनच नृत्याची आवड होती. शाळेत ती शिक्षणासोबतच सास्कृतीक कार्यक्रमात देखील सहभाग घेत होती.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मायक्रोबायोलॉजिस्ट होण्यासाठी कॉलेज जॉईन केलं. मात्र त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली. 1984 साली तिला दूरदर्शनवर पहिला शो मिळाला मात्र काही कारणांमुळे तिला दूरदर्शने रिजेक्ट केलं. त्यानंतर तिने 1984 साली राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट असलेल्या ‘अबोध’मधून डेब्यू केलं. मात्र या चित्रपटाला फार काही यश मिळालं नाही. त्यानंतर माधुरी दीक्षित दूरदर्शनचा क्रार्यक्रम असलेल्या पेइंग गेस्ट शो मध्ये गेस्टच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने ‘आवारा बाप’, ‘स्वाती’, ‘हिफाजत’ या सारख्या काही चित्रपटांमध्ये भूमिका केली, मात्र 1988 साली आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटाने माधुरी दीक्षितच करिअर एका वेगळ्या उंचिवर पोहोचलं, त्यातील ‘मोहिनी’ गाण्यावर तिने केलेल्या नृत्यामुळे माधुरी दीक्षित सुपरस्टार बनली. 90 च्या दशकात माधुरी दीक्षिला सर्वात मोठी सुपरस्टार अभिनेत्री मानलं जायचं.

दरम्यान 1999 साली माधुरी दीक्षितचं लग्न डॉ. श्रीराम माधव नेने यांच्यासोबत झालं. त्यानंतर ती अमेरिकेमध्ये स्थायीक झाली. लग्नानंतर आठ वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा ती अभिनय क्षेत्राकडे वळली, 2007 साली तिने ‘आजा नचले’ चित्रपटातून पुन्हा एकदा आपलं करिअर सुरू केलं. तिने 2014 साली आलेल्या ‘डेढ़ इश्किया’ आणि ‘गुलाब गैंग’ सारख्या चित्रपटामध्ये देखील महत्त्वाची भूमिका केली.

Follow Us