जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिल्याने 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक वारकरी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिल्याने 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक वारकरी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. पालखी जेजुरीत दाखल होत असताना भंडाऱ्याच्या उत्साहात वारी सुरू होती. त्याचवेळी एक टेम्पो अचानक अनियंत्रित झाला आणि थेट दिंडीत घुसला.
या धडकेत अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून 2 जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली असून जखमींना शासनाकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर जखमींना आणि इतर वारकऱ्यांना कोणतीच अडचण येऊ नये याची काळजी घ्या, अशी दटावणी व्यवस्थापनाला केली आहे.
Published on: Jul 13, 2026 12:37 PM
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...

