AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर CSK ने फोडला बॉम्ब, तो एक निर्णय घेतला अन् चाहत्यांना दिला सर्वात मोठा धक्का; आता पुढील हंगामात…

पुढील आयपीएल हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघात मोठा बदल झाला आहे. चाहत्यांना ज्याची भीती होती आता तेच घडणार आहे.

अखेर CSK ने फोडला बॉम्ब, तो एक निर्णय घेतला अन् चाहत्यांना दिला सर्वात मोठा धक्का; आता पुढील हंगामात...
Stephen Fleming
| Updated on: Jul 13, 2026 | 1:23 PM
Share

पुढील वर्षी आयपीएल हंगामात अनेक बदल पाहायला मिळतील अशी अपेक्षा नाकारु शकत नाही, अनेक मोठं मोठे ट्रेड होण्याचीही शक्यता आहे. ज्या संघाकडून अपेक्षा होती त्या संघानी आता संपलेल्या आयपीएल हंगामात अनेक चुका केल्या. त्यामुळे संघ नवीन जोडणासाठी अनेक बदल करतील. आता काही संघानी तर त्याची सुरुवातही केली आहे. यातच आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्समधून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. संघात मोठा बदल करण्यात आला आहे ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गेल्या 18 वर्षांपासून संघासोबत असलेले मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी परस्पर संमतीने संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीच्या म्हणण्यानुसार, फ्लेमिंग आणि सीएसके व्यवस्थापन यांच्यात अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे चेन्नईसाठी एका ऐतिहासिक पर्वाचा अंत झाला आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग 2008 मध्ये आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाले. पुढच्या वर्षी, 2009 मध्ये, त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका स्वीकारली. 2009 ते 2026 या काळात, फ्लेमिंग यांनी एम.एस. धोनीसोबत एक मजबूत भागीदारी तयार केली, ज्याने आयपीएलमध्ये इतिहास रचला. त्यांच्या नेतृत्वाखाली, सीएसके लीगचा सर्वात सातत्यपूर्ण संघ म्हणून उदयास आला.

चेन्नई सुपर किंग्सला एक ब्रँड आणि चॅम्पियन संघ बनवण्यात स्टीफन फ्लेमिंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या 18 वर्षांच्या काळात चेन्नई सुपर किंग्सने उत्कृष्ट कामगिरी केली. फ्लेमिंगच्या प्रशिक्षणाखाली संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद आणि दोन वेळा चॅम्पियन्स लीग टी20 ट्रॉफी जिंकली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसकेने विक्रमी 12 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला. इतकेच नाही, तर फ्लेमिंगच्या कार्यकाळात चेन्नईने विक्रमी 10 वेळा आयपीएलचा अंतिम सामना गाठला.

आता फ्लेमिंग बाहेर पडत असल्यामुळे चाहत्यांना एक दाट शंका वाटू लागली आहे. ती शंका म्हणजे जर फ्लेमिंग संघातून कोच म्हणून बाहेर पडत असेल त्यांच्याऐवजी महेंद्र सिंग धोनी स्वत: कोच म्हणून मैदानात उतरतील. कारण धोनी या हंगामात खेळला नव्हता. यामुळे पुढील हंगामाता त्याची खेळण्याची शक्यता जरा कमीच भासत आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?