AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG T20 मालिका गमावल्यामुळे बीसीसीआय आक्रमक, दोन लोकांवर कारवाई पक्की, थेट संघातून पत्ता कट

इंग्लंड दौरा संपल्यानंतर आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहे. भारतीय संघाने टी-20 मालिका गमावल्यामुळे बीसीसीआय आता मोठ मोठे बदल करणाच्या तयारीत आहे.

IND vs ENG T20 मालिका गमावल्यामुळे बीसीसीआय आक्रमक, दोन लोकांवर कारवाई पक्की, थेट संघातून पत्ता कट
team india coaching staff
| Updated on: Jul 13, 2026 | 11:33 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सामन्यात भारतीय संघाचे अतिशय वाईट प्रदर्शन पाहायला मिळाले. परिणामी मालिका इंग्लंडने जिंकली. आता या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात अनेक बदल होणार आहे. या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात बीसीसीआय बदल करणार असे म्हटले जात होते.  भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपल्यामुळे, कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल होणार आहेत. गौतम गंभीरचे दोन सर्वात विश्वासू सहकारी, रायन टेन डोशेट आणि मॉर्न मॉर्केल यांच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची बैठक होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर त्यांचे करार संपत आहेत. वृत्तानुसार, रायनचा संघातून बाहेर पडणे निश्चित आहे, तर मॉर्केलच्या बाबतीत चर्चा सुरु आहे.

2024 मध्ये जेव्हा गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्याने स्वतः रायन टेन डोशेट आणि मॉर्न मॉर्केल यांची कोचिंग स्टाफमध्ये निवड केली होती. हे दोघेही गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होते, तर अभिषेक नायर सुरुवातीला सहायक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याने संघ सोडला. आता असे मानले जात आहे की डोशेट आणि मॉर्केल हे देखील गंभीरपासून वेगळे होतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रायनने एका आयपीएल फ्रँचायझीसोबत चर्चा सुरू केली आहे, तर ते इतर पर्यातही शोधत आहे.

भारतीय संघाच्या अलीकडील खराब क्षेत्ररक्षणामुळे टी. दिलीप यांची नोकरीही धोक्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाने बीसीसीआय विशेष प्रभावित नाही. दिलीप 2021 पासून भारतीय संघासोबत आहेत. ते अभिषेक नायरसोबत निवृत्त होणार होते, परंतु नंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली. तसेच, हे  सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अंतिम एकदिवसीय सामना 19 जुलै रोजी इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे, बीसीसीआयने कामाच्या व्यवस्थापनासाठी लक्ष्मण यांना झिम्बाब्वेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली