AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का

CJP-Congress-BJP: देशात एका सर्व्हेची जोरदार चर्चा सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टी या सर्व्हेंच्या केंद्रस्थानी आहे. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यातील जवळपास अर्ध्या तरुणाईने सीजेपीची बाजू उचलून धरली आहे. पण सीजेपीचा फायदा काँग्रेस अथवा भाजपपैकी कुणाला अधिक फायदा होणार आहे?

कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अभिजीत दिपकेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 28, 2026 | 9:52 AM
Share

जर कदाचित लोकसभा निवडणूक झाली तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील NDA, राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तारूढ होऊ शकते. वास्तविक यापूर्वीच्या काही सर्वेमध्ये मात्र याच्या उलट एनडीएचा ग्राफ खाली आला होता. मतदानाच्या टक्केवारीतही घसरण दिसत होती. एका ताज्या सर्व्हक्षणानुसार, देशात काँग्रेसची स्थिती मजबूत झाली आहे. काँग्रेसवर लोकांचा विश्वास वाढला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर हा सर्वे करण्यात आला. त्यातून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहे.

NDA ला बहुमत पण अनेक जागांवर पडझड

इंडिया टुडे सी वोटरच्या ताज्या मूड ऑफ नेशनच्या सर्वेनुसार, आज जर निवडणूक झाली तर NDA ला देशभरात 326 जागा मिळतील. जानेवारी 2026 मध्ये NDA साठी 352 जगांचा अंदाज बांधल्या जात होता. पण गेल्या सहा महिन्यात एनडीएची बाजू लंगडी झाली आहे. त्यांना यापूर्वी वर्तवलेल्या जागांपैकी 26 जागांचा स्पष्टपणे फटका दिसत आहे. असे असले तरी सत्ता स्थापनेसाठी NDA कडे बहुमताची बेगमी असेल. केंद्रात सत्ता स्थापनेसाठी एनडीएकडे बहुमत असेल.

अर्थात हा आकाड 2024 मध्ये दिलेल्या ‘अब की बार 400 पार’ या घोषणेपासून कोसो दूर असल्याचे समोर येत आहे. सर्वेनुसार लोकांना एनडीएवर विश्वास आहे. त्यांचा पाठिंबा सुद्धा आहे. पण महागाई, परस्परविरोधी निर्णय, अनेक मुद्यांवर धरसोड वृत्ती आणि सामाजिक विषयाबाबतचे धोरण यावरून नाराजी वाढलेली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक झाली तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 26 जागांचा मोठा फटका बसू शकतो.

भाजपच्या जागा घसरणार, काँग्रेसला 26 जागांचा फायदा

या सर्वेनुसार, भाजपाला नुकसान होताना दिसते. ताजा सर्वेनुसार, भाजपला निवडणूक झाल्यास 261 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. जानेवारी 2026 मध्ये असाच सर्वे केला तेव्हा पक्षाला 287 जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसून आले होते. गेल्या सहा महिन्यात भाजपला 26 जागा कमी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपने 2024 मधील लोकसभा निवडणुकीत 240 जागांवर विजय मिळवला होता. सर्वेनुसार पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळू शकतात.

तर उलट काँग्रेसला या सर्वेत झुकते माप देण्यात आले आहे. काँग्रेसला 106 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. जानेवारीत करण्यात आलेल्या सर्वेत काँग्रेसला 80 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. यावेळी त्यात मोठी सुधारणा झाल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. 26 जागा काँग्रेसच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. ऑगस्ट 2025 मधील सर्व्हेत काँग्रेसला 97 जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. त्या तुलनेत आता पक्षाची स्थिती सुधारल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान