AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Nigam: हिंदूंची किती परीक्षा घेणार.. क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून भडकला सोनू निगम? सत्य काय?

Kriti Sanon : क्रिती सेननच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. जाहिरातीत क्रिती आधुनिक पोशाखात रक्षाबंधन साजरं करताना दिसली होती. तिच्या पोशाखावर काही सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला.

Sonu Nigam: हिंदूंची किती परीक्षा घेणार.. क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून भडकला सोनू निगम? सत्य काय?
Kriti Sanon and Sonu NigamImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2026 | 10:07 AM
Share

अभिनेत्री क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या जाहिरातीवर गायक सोनू निगमने तीव्र प्रतिक्रिया दिल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, या पोस्टशी आपला काहीही संबंध नसल्याचं खुद्द सोनू निगमने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे क्रितीच्या जाहिरातीवरील वादासोबतच फेक सोशल मीडिया अकाउंट आणि चुकीच्या नावाने पसरवण्यात आलेल्या वक्तव्याचा मुद्दाही समोर आला आहे. सोशल मीडियावर ‘Sonu Nigam Singh’ नावाच्या X अकाउंटवरून क्रिती सनॉनच्या जाहिरातीबाबत एक पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये जाहिरातीचा मुद्दा केवळ महिलांच्या कपड्यांशी संबंधित नसून हिंदू सण आणि परंपरांशी संबंधित असल्याचं म्हटलं होतं. ही पोस्ट प्रसिद्ध गायक सोनू निगमचीच असल्याचा अनेकांनी समज करून घेतला. मात्र, हा दावा चुकीचा असल्याचं सोनू निगमने स्पष्ट केलं.

पोस्टमध्ये काय लिहिलंय?

‘हा वाद महिला काय परिधान करते याबद्दल अजिबात नाही. समस्या आहे ती दुटप्पीपणाची आणि हिंदू सणांच्या परंपरांचा वापर करून लोकांना प्रभावित करण्याच्या युक्तीची. कारण क्रिती सनॉनने अशा प्रकारचे कपडे पहिल्यांदाच घातले आहेत आणि त्यामुळे वाद निर्माण झाला आहे, असं नाही. कधी, कुठे आणि काय परिधान करावं याबाबत एक विशिष्ट शिष्टाचार असतो. उदाहरणार्थ, गुरुद्वारात प्रवेश करताना डोकं झाकण्याची परंपरा आहे, तर मंदिरात साधे, पूर्ण अंग झाकणारे आणि सभ्य कपडे परिधान केले जातात. अनेक मंदिरांमध्ये पुरुषांनाही हाफ पँट घालण्यास मनाई असते. मात्र, तिथे कोणीही ‘आपल्याला हवे ते कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे’ असा गाजावाजा करत नाही. त्यामुळे लोकशाही देशात हिंदूंच्या श्रद्धेला वारंवार धक्का देण्याचा प्रयत्न थांबवा. हिंदू सहिष्णू आहेत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही वारंवार त्यांच्या संयमाची परीक्षा घेत राहावी. ‘जिवा’ने हा जाहिरातीचा व्हिडीओ हटवला आहे आणि त्यासाठी धन्यवाद,’ अशी पोस्ट या अकाऊंटवरून करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या बातमीचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करत सोनू निगमने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, हे वक्तव्य त्याने केलेलं नाही. संबंधित X अकाउंटही त्याचं नसल्याचं सोनूने स्पष्ट केलं. सोनू निगमचं X या प्लॅटफॉर्मवर कोणतंच अकाऊंट नाही. प्रत्यक्षात समान नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटवरील पोस्टमुळे हा गैरसमज निर्माण झाला.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग