Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..

Kriti Sanon Rakhi Ad: अभिनेत्री क्रिती सनॉनने तिच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 4:06 PM
1 / 5
अभिनेत्री क्रिती सनॉन सध्या तिच्या रक्षाबंधनच्या विशेष जाहिरातीमुळे चर्चेत आहे. दागिन्यांच्या ब्रँडसाठी केलेल्या या जाहिरातीत क्रितीने परिधान केलेल्या कपड्यांवरून सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेतला. याशिवाय जाहिरातीत ती तिच्या पाळीव श्वानाला राखी बांधताना दिसल्यानेही काही जणांनी नाराजी व्यक्त केली.

2 / 5
या जाहिरातीत क्रिती डीप नेक ब्लाऊज आणि स्कर्ट अशा इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांना हा तिचा पेहराव रक्षाबंधनसारख्या पारंपरिक सणाच्या संदर्भात योग्य वाटला नाही. काहींनी तर तिच्या कपड्यांशी तुलना अंतर्वस्त्रांशी केली. सततच्या टीकेनंतर क्रितीने अखेर इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित या वादाला उत्तर दिलं.

3 / 5
सणांचं खरं महत्त्व तुम्ही कोणते कपडे घालता यात नाही, तर परंपरांबद्दल तुमच्या मनात असलेल्या भावना आणि त्यांचा अर्थ समजून घेण्यात आहे. रक्षाबंधन म्हणजे संरक्षणाचं नातं. मी आणि माझी बहीण एकमेकींना राखी बांधतो. भाऊ ज्याप्रकारे बहिणीचं रक्षण करतो, त्यापेक्षा कमी नाही तर तितकंच आम्ही एकमेकींचं रक्षण करू शकतो, याची आम्हाला जाणीव आहे, असं क्रितीने म्हटलंय.

4 / 5
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलंय, 'आम्ही एकमेकींच्या उत्तम आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आमच्यासाठी ही प्रार्थना आणि एकमेकींच्या रक्षणाचं वचन आमच्या पाळीव श्वानांसाठीही लागू होतं. शेवटी तेही आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत.

5 / 5
आणखी एक गोष्ट.. आपण महिलांनी काय कपडे घालावेत, हे सांगणं कधी थांबवणार आहोत? गेल्या अनेक वर्षांत एथनिक फॅशनमध्ये मोठा बदल झाला आहे. मात्र आजही एखाद्या महिलेचा आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर फक्त तिच्या कपड्यांवरूनच का ठरवला जातो? संस्कृती आणि परंपरा तिच्या मनात असतात, तिच्या नेकलाइनमध्ये नाही, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलंय.

Follow Us