AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari: मंत्र्यांच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी खंत, जातीय सेलवरही निशाणा

Nitin Gadkari Criticized : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकारणावर मोठे भाष्य केले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध पक्षातील जातीय सेलवरही निशाणा साधला.

Nitin Gadkari: मंत्र्यांच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी खंत, जातीय सेलवरही निशाणा
नितीन गडकरी
| Updated on: Aug 28, 2026 | 11:06 AM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर निशाणा साधला. आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्यांच्या पोटातून मंत्री तयार होत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. तर अनेक राजकीय पक्षांमध्ये जातीचे सेल तयार केले जात आहेत, त्यावरही त्यांनी चिंता व्यक्त करत ते काहीही उपयोगाचे नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी राजकीय घराणेशाहीवर त्यांनी तोंडसूख घेतले.

घराणेशाहीवर गडकरींचे तोंडसुख

सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या षट्यब्दीपूर्ती कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्यांच्या पोटातून मंत्री तयार होतो, ही प्रथा बंद करण्याची मागणी त्यांनी व्यक्त केली. याचा अर्थ कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही. पण समाजसुधारकांच्या जीवनातून समाजसुधारक तयार झाले पाहिजेत, असे ते म्हणाले. आई-वडिलांच्या पुण्याईवर नाही तर स्वकर्तृत्वाने चमकले पाहिजे. बाबा आमटे थोर होते, तेवढंच काम विकास आणि प्रकाश आमटे यांनी केल्याचे ते म्हणाले. प्रत्येक राजकारणी हा आपल्या पुढील निवडणुकीचा विचार करतो. तर सामाजिक आणि आर्थिक सुधारक हा शतकानुशतकांचा विचार करतो. जर तुम्ही उत्तम सामाजिक काम केलं तर तुम्हाला पोस्टर लावायची गरज नाही. कटआऊट लावायची गरज नाही. तुम्हाला लोकांकडे जाऊन मतं मागण्याची गरज नाही असे ते म्हणाले.

देशात 5 कोटी नवीन रोजगार

सीआयआय-आयटीसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडून आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला. 2030 सालापर्यंत भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल असे दावा त्यांनी केला. तर या कालावधीत देशात 5 कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. सध्या भारतात 57 लाख नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनं आहेत. एकूण बाजारपेठेत हे प्रमाण 7 टक्के इतके आहे. जेव्हा आपण वाहतूक मंत्री म्हणून या मंत्रालयाचा कारभार स्वीकारला. तेव्हा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार हा 14 लाख कोटी रुपये इतका होता. आता तो वाढून 22 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचल्याची माहिती त्यांनी दिली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान