
आजकाल कान्स खूप चर्चेत आहे, या काळात लोकांना स्टार्सचे लूक पाहण्यात खूप रस आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात चित्रपट कलाकारांसोबतच सोशल मीडिया इंफ्लूएंसर सुद्धा सहभागी झालेले पाहायला मिळाले. कान्समध्ये सर्वच सेलिब्रिटींची चर्चा आहे. प्रत्येकाचा लूक ते प्रत्येकाचा वेगळा अंदाज पहायला मिळाला. पण सध्या कान्समध्ये चर्चा आहे ती एका डॉक्टरची. जिच्या सौंदर्यापासून ते तिच्या लूकपर्यंत सर्वांचीच चर्चा होताना दिसत आहे.
इंदोरमधील डॉक्टर कान्सच्या रेड कार्पेटवर लक्षवेधी ठरली
इंदोरमधील एका डॉक्टरने कान्सच्या रेड कार्पेटवर बरीच प्रसिद्धी मिळवली. ती म्हणजे डॉ. निकिता कुशवाह. निकिता मिसेस युनिव्हर्स 2024 ची पहिली रनरअप राहिली आहे. जेव्हा निकिता तिच्या ब्लश पिंक गाऊनमध्ये रेड कार्पेटवर दिसली तेव्हा तिने सर्वांचेचं लक्ष वेधून घेतले. तिने जॉली पॉली कॉउचर गाऊन घातला होता ज्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
डिज्नी प्रिन्सेस
निकिता ही इंदूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने हृदय आणि श्वसन फिजिओथेरपिस्ट (कार्डियक और रेस्पिरेटरी फिजिओथेरेपिस्ट) आहे. तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या व्हिएतनाम एडिशनमध्ये डेब्यू केला होता. या एडिशनमध्ये भारताच्या प्रतिभेबद्दल आणि सामाजिक समस्यांबद्दल चर्चा केली.निकिताचा संपूर्ण लूक ‘फेअर गॉडेस ऑफ स्प्रिंग’ या गाऊन थीमवर होता. हा आकर्षक फ्लेयर्ड आणि ट्रेल गाऊन बनवण्यासाठी तीन महिने लागले. एवढेच नाही तर ते बनवण्यासाठी 50 कारागिर लागले होते.निकिताच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर बरेच लोक तिला डिज्नी प्रिन्सेस म्हणत आहेत.
आकर्षक दागिने
तिने तिचा आकर्षक ट्रेल गाऊन हिऱ्यांच्या दागिन्यांसह परिधान केला होता. यामुळे तिचा एकंदरीत लूक अगदी परिपूर्ण दिसतोय. निकिता 2024 पासून लोकांमध्ये चर्चेत होती. तिने दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धा मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत 100 हून अधिक देशांतील लोकांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये ती पहिली उपविजेती ठरली.