Drishyam 3: विजय साळगवकरची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिलाच मंगळवार ठरला शुभ, 5 दिवसात इतक्या कोटींची कमाई

Drishyam 3: अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम 3' सिनेमा बॉक्स ऑफिस बक्कल कमाई करताना दिसत आहे. 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगलीच मजल मारली. पण आठवड्याची सुरुवात झाल्यानंतर सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला. पण तरी देखील सिनेमाने 5 दिवसात बक्कळ कमाई केली आहे.

Drishyam 3: विजय साळगवकरची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिलाच मंगळवार ठरला शुभ, 5 दिवसात इतक्या कोटींची कमाई
Drishyam 3
| Updated on: Oct 07, 2026 | 8:30 AM

Drishyam 3: अभिनेता अजय देवगण स्टारर ‘दृश्यम 3’ सिनेमा बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई करताना दिसणार आहे. सिनेमातील विजय साळगावकर याची चालाकी आणि ज्याप्रकारे त्याने कुटुंबाची सुरक्षा केली, याच कारणामुळे सिनेमा बॉक्स ऑफिस मोठी कमाई करत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात मोठी गर्दी करत आहेत. पाचव्या दिवशी देखील सिनेमाने मोठी कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवसांमध्ये सिनेमाने भारतात 200 कोटी रुपयांचा आकडा पार करत आहे. आठवड्याची सुरुवात झाल्यानंतर सिनेमाच्या कमाईचा आकडा थोडाफार मंदावला, पण सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागलेला नाही. 5 दिवसात सिनेमाने जगभरात 341.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘दृश्यम 3’ सिनेमाच्या कलेक्शनची चर्चा रंगली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, फक्त पाच दिवसांत सिनेमाने जगभरात 340 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या पाचव्या दिवशी केलेल्या दमदार कमाईसह भारतातील सिनेमाचं एकूण नेट कलेक्शन 216.50 कोटी रुपयांवर पोहोचवलं आहे, तर जगभरात या सिनेमाने 340 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याने सिनेमा येत्या दिवसांत किती कोटींपर्यत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...

पहिल्या दिवशी 62 कोटी रुपयांची ऐतिहासिक ओपिनिंग केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी 53.50 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 61 कोटी रुपयांचं भरभक्कम नेट कलेक्शन नोंदवलं गेलं. चौथ्या दिवशी वीकेंड संपल्याचा परिणाम दिसून आला आणि कमाई घसरून 21 कोटी रुपयांवर आली. ‘दृश्यम 3: द कन्क्लुजन’ ने पहिल्या मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या पाचव्या दिवशी भारतात सुमारे 19 कोटी रुपयांची नेट कमाई केली.

भारतासोबतच परदेशातही ‘दृश्यम 3’ ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी ओव्हरसीज मार्केटमधून 18.50 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाने 20 – 20 कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या दिवशी परदेशातून सुमारे 5 कोटी रुपये मिळाले, तर पाचव्या दिवशी सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमध्ये जवळपास 9.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह परदेशात सिनेमाची एकूण कमाई 81.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतात सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन सुमारे 259.80 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर परदेशातील 81.50 कोटी रुपये मिळून सिनेमाचं वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन 341.30 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. म्हणजेच रिलीजच्या फक्त पाच दिवसांतच या सिनेमाने जगभरात 340 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आता सिनेमा चित्रपटगृहात कधीपर्यंत टिकतो आणि किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us