Drishyam 3 OTT Release Date : आता घरबसल्याही पाहता येणार अजय देवगणचा क्राईम थ्रिलर, ‘दृश्यम 3’ थिएटरनंतर OTT वर कधी येणार?
अजय देवगणच्या दृश्यमचा तिसरा आणि शेवटचा पार्ट रिलीज झाला आहे. या महिन्याच्या सुरूवातील आलेल्या 'दृश्यम: द कन्क्लूजन'ने थिएटर्समध्ये धमाल केली आहे. आता चाहत्यांना OTT रिलीजची प्रतिक्षा आहे. कधी आणि कुठे पाहता येणार हा पिक्चर ?

Drishyam 3 OTT Release : अभिनेता अजय देवगणचा क्राइम थ्रिलर चितरपट दृश्यमच्या पार्ट 3 ने बॉक्स ऑफीसवर खळबळ माजवली आहे. प्रेक्षकांच्या मनातही या चित्रपटाने घर केलं आहे. एक सामान्य माणूस, जो कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या समोर उभा ठाकतो. बुद्धीच्या खेळात गुंतागुंतीची झालेली ही कहाणी.. सत्य समोर असूनही तेच सत्य आहे, हे सिद्ध करून दाखवणं तेवढं सोपं नाही. या चित्रपटात विजय साळगांवकरने दर वेळेस पोलिसांना मात दिली आहे. 2 ऑक्टोबर रोजी या चित्रटाचा तिसरा आणि शेवटचा ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ हा पार्ट रिलीज झाला. या क्राइम थ्रिलर फिल्मने बॉक्स ऑफीसवर देखील चांगली कामगिरी केली असून प्रदर्शनानंतर 21 दिवसांनी देखील चित्रपटाची थिएटरमध्ये पकड कायम आहे. अनेकांनी थिएटरला जाऊन हा पिक्चर पाहिला खरा, पण अनेकांना तशी संधि मिळाली नाही. मात्र अशा प्रेक्षकांसाठी ओटीटीचा ऑप्शन असून हा पिक्चर ओटीटीवर कधी रिलीज होतोय, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा नेकमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ? चला जाणून घेऊया.
नेटफ्लिक्स (Netflix) वर येणार ‘दृश्यम 3’?
अजय देवगणची फिल्म ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ ओटीटीवर कधी येणार याबद्दल आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार ही फिल्म नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. फिल्मच्या ओपनिंग क्रेडिटमध्ये नेटफ्लिक्स (Netflix)चं नाव पाहून ह्या प्लॅटफॉर्मवरच स्ट्रीम होईल असं सांगितलं जात आहे. तरीही, 23 ऑक्टोबर 2026 पर्यंत फिल्मच्या ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ही फिल्म्स थिएटर्समध्ये रिलीज झाल्यानंतर साधारण 6-8 महिन्यांनंतर ओटीटीवर येण्याची शक्यता असते. ह्या हिशोबाने ही नोव्हेंबर 2026 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकते. पण अद्याप मेकर्सकडून अशा कोणत्याही तारीखेनं पुष्टी केलेली नाही.
‘दृश्यम: द कन्क्लूजन’ च्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर यंदा काही नवीन चेहरेही चित्रपटात दिसले. यात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगांवकरच्या भूमिकेत दिसला. तर त्याच्यासोबत तब्बू – मीरा देशमुख, श्रिया सरन – नंदिनी, रजत कपूर आणि इशिता दत्ता हे आपल्या जुन्या भूमिकांमध्ये दिसले. तसेच, चित्रपटात मृणाल जाधवही चित्रपटाचा भाग आहे. तर तिसऱ्या भागात प्रकाश राज आणि जयदीप अहलावत ही नवीन पात्र दिसली.
दृश्यम 1 आणि दृश्यम 2 ओटीटीवर कुठे पाहू शकता ?
अजय देवगणच्य़ा या हिंदी फिल्म पहिला भाग म्हणजेच, दृश्यम 1 आणि दृश्यम 2 दोन्ही Amazon Prime वर पाहता येतील. फिल्मचा तिसरा भाग रीलिज होण्यापूर्वी या फिल्म्स ओटीटीवर ट्रेंड करत होत्या. आता पाहायचं आहे की त्याचा तिसरा भाग ओटीटीवर काय धमाल करतो. त्याची अधिकृत तारीख कधी येते, याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.