AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 Trailer : आता हा खेळ डोक्याचा नाही, नशिबाचा… विजय साळगावकरचा शेवटचा खेळ?; ‘दृश्यम 3’चा थरारक ट्रेलर चर्चेत

Drishyam 3 Trailer : अजय देवगणच्या बहुचर्चित 'दृश्यम 3' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या भागांत विजय साळगावकरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत, कारण आता जयदीप अहलावत सुद्धा मैदानात आहेत.

Drishyam 3 Trailer : आता हा खेळ डोक्याचा नाही, नशिबाचा… विजय साळगावकरचा शेवटचा खेळ?; ‘दृश्यम 3’चा थरारक ट्रेलर चर्चेत
Drishyam 3 trailer released
| Updated on: Sep 09, 2026 | 2:29 PM
Share

Drishyam 3 Trailer : ‘दृश्यम’च्या ( Drishyam)  पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली. विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगणने आपल्या हुशारीने पोलिसांनाच नव्हे तर प्रत्येकाला चकमा देत रचलेली कहाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरली. आता या गाजलेल्या फ्रँचायझीचा शेवटचा अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दृश्यम 3’च्या  (Drishyam 3) रिलीजपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, तो पाहिल्यानंतर विजयसमोर यावेळी नेमकं किती मोठं संकट उभं राहणार आहे, याची उत्सुकता वाढली आहे.

2 मिनिटे 49 सेकंदांचा थरारक ट्रेलर

दृश्यमचा 2 मिनिटे 49 सेकंदांचा हा ट्रेलर दमदार संवाद आणि रहस्याने भरलेला आहे. ट्रेलरची सुरुवात सौरभ शुक्ला यांच्या संवादाने होते. तब्बू त्यांना विचारते की, विजयच्या कथेचा पुढचा भाग लिहायचा झाला तर यावेळी विजय काय करेल? त्यावर सौरभ शुक्ला सांगतात, ‘ विजय काय करेल, तो काय करणार नाही, हे फक्त विजयला माहीत आणि त्या देवाला..’  यानंतर अजय देवगणचा विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात दिसतो. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे ट्रेलरवरून जाणवतं.

न्याय नको मीरा देशमुखला हवाय बदला

विजयच्या आयुष्यात पुन्हा एकदा मीरा देशमुखची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री तब्बू साकारत असलेली ही व्यक्तिरेखा आपल्या मुलगा सॅमच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विजयच्या मागे लागली आहे. ट्रेलरमध्ये मीरा स्पष्टपणे सांगते की, तिला न्याय नको, तर मुलाच्या मृत्यूचा बदला हवा आहे. त्यामुळे यावेळी विजयला स्वतःला केवळ पोलिसांपासून वाचवायचं नाहीये तर मीरा देशमुखच्या सूडापासूनही कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील त्याच्या खांद्यावर आहे. ‘ आता हा खेळ डोक्याचा नाही, तर नशिबाचा बनला आहे.’ – अजय देवगणच्या एक संवादावरून या संपूर्ण परिस्थितीची झलक दिसते.

अभिनेते प्रकाश राज हे देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ते मीरा देशमुख यांच्या वकिलाची भूमिका साकारणा असून त्यांचाही एक दमदार संवाद आहे. ‘तो अशिक्षित असेल, पण मूर्ख नाही. त्याला कमी लेखण्याची चूक मी करू शकत नाही’, असं ते विजयबद्दल म्हणतात.

मात्र, ट्रेलर पाहिल्यावर असं दिसतं की विजयसमोर सर्वात मोठे आव्हान हे जयदीप अहलावत उभे करणार आहेत. हाँ अभिनेता या चित्रपटात क्राइम ब्रँचच्या एसपीची भूमिका साकारत असून, ट्रेलरमध्ये ते अजय देवगणच्या विजयला जोरदार टक्कर देताना दिसलेत.

‘दृश्यम 3’ रिलीज डेट

आता विजयचा खेळ संपणार आहे की तो पुन्हा एकदा सर्वांना चकवणार आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. ‘दृश्यम 3’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाला ‘दृश्यम: द कंक्लूजन’ असं नाव दिलंय. यावरून हा चित्रपट म्हणजे या फ्रँचायझीमधील शेवटची फिल्म असल्याचं स्पष्ट होतं. आता निर्माते या गूढ आणि थरारक कथेचा शेवट नेमका कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Follow Us
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....