धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एका झाडाखाली दिवा लावण्यात आला? या विधीचा अर्थ नेमका काय?

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी एका झाडाखाली दिवा लावल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले गेले. तसेच हे पाहून अनेकांना आश्चर्यही वाटलं होतं. पण त्यामागे अध्यात्मिक काही अर्थ असेल का? असा प्रश्नही हा व्हिडीओ पाहून अनेकांना पडला.

धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एका झाडाखाली दिवा लावण्यात आला? या विधीचा अर्थ नेमका काय?
Dharmendra funeral
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2025 | 4:11 PM

बॉलिवूडमधला सर्वांचा आवडता अभिनेता, सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता धर्मेंद्र यांनी काल 25 नोव्हेंबर 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत जणू काही सन्नाटा पसरला आहे. अजून सगळे धक्क्यातच आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांना प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरातही त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. मात्र त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी या जगातून एक्झीट घेतली आहे.

स्मशानभूमीतील एका झाडाखाली दिवा लावण्यात आला

धर्मेंद्र यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक कलाकार स्मशानभूमीत उपस्थित होते. त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आले होते? या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. परंतु एका व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ते म्हणजे धर्मेंद्र यांच्या निधनाची अधिकृत बातमी बाहेर येण्यापूर्वीच त्यांच्या मुलीने हातात पेटता दिवा घेत तो झाडाखाली एका कोपऱ्यात ठेवल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून आलं. पण हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. पण त्यामागे अध्यात्मिक काही अर्थ असेल का? असा प्रश्नही हा व्हिडीओ पाहून अनेकांना पडला.


मृत्यूनंतर दिवा पेटवणे हे हिंदू धर्मात फार महत्त्वाचा विधी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये “स्मशानभूमी” असं लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला एक पेटता दिवा हातात घेऊन येते आणि तो ती झाडाखाली एका कोपऱ्यात ठेवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमधील ही महिला धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची मुलगी असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, एखाद्याच्या मृत्यूनंतर दिवा पेटवणे हे हिंदू धर्मात फार महत्त्वाचा विधी मानला जातो.

हा दिवा का लावला जातो?

ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धांमधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले की मृत्यूनंतर घराच्या दारावर दिवा लावणे हे सहसा “पूर्वजांना शांती देण्यासाठी” केले जाते. हा दिवा मृत आत्म्याच्या पुढील प्रवासाला प्रकाश देण्यासाठी, सुरळीत मार्ग सुनिश्चित करण्यासाठी आणि अंधारापासून दूर राहण्यासाठी लावला जातो. हा दिवा किंवा त्याचा प्रकाश व्यक्तीला पुढे जाण्याचे मार्गदर्शन करतो असे म्हटले जाते. हा दिवा बहुतेकदा 13 दिवस सतत जळत ठेवला जातो, ही प्रथा अखंड ज्योती म्हणून ओळखली जाते. तथापि, ही प्रथा स्थानानुसार थोडी फार बदलू शकते.