Eetha Trailer : मेरा भरोसा ही मेरा घमंड था… ‘ईठा’ चा जबरदस्त ट्रेलर OUT, श्रद्धा कपूरचा आजवरचा सर्वात दमदार अवतार !

Eetha Trailer : श्रद्धा कपूरचा आगामी 'ईठा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात ती 'तमाशा सम्राज्ञी' विठाबाई नारायणगावकरांची भूमिका साकारत असून, तिचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय. लौकरच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

Eetha Trailer : मेरा भरोसा ही मेरा घमंड था… ‘ईठा’ चा जबरदस्त ट्रेलर OUT, श्रद्धा कपूरचा आजवरचा सर्वात दमदार अवतार !
| Updated on: Oct 30, 2026 | 3:43 PM

Eetha Trailer Out : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळानंतर श्रद्धा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये श्रद्धाचा आजवर कधीही न पाहिलेला दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात श्रद्धासोबत अभिनेता रणदीप हुड्डादेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे, तर दिनेश विजन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटात महाराष्ट्राची लोककला, परंपरा आणि संस्कृतीला विशेष महत्त्व देण्यात आल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.

कसा आहे श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा ट्रेलर ?

Loading...

‘ईठा’च्या ट्रेलरची सुरुवात दमदार संवाद आणि भावनिक प्रसंगांनी होते. यामध्ये एका कलाकाराचा संघर्ष, जिद्द, अपयश आणि यशापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच श्रद्धाच्या तोंडी असलेला एक संवाद लक्ष वेधून घेतो. “तुम्हीच म्हटलं होतं, बघूया काय तुटतं? माझा विश्वास की माझा अहंकार. माझा विश्वासच माझा अहंकार होता. जेव्हा तो तुटला ना, सगळं तुटलं.”

 

या संवादातून तिच्या पात्राच्या आयुष्यातील भावनिक संघर्षाची झलक पाहायला मिळते. त्यानंतर तिच्या यशाचा प्रवास, मिळालेले पुरस्कार आणि एका सामान्य मुलीपासून यशस्वी कलाकार होण्यापर्यंतचा प्रवास उलगडताना दिसतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता एका कलाकाराच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी सांगणार असल्याचं दिसत आहे.

नऊवारी साडीचा उल्लेख अन् मराठी संस्कृतीचा अभिमान !

या ट्रेलरमधील सर्वाधिक लक्षवेधी भाग म्हणजे नऊवारी साडीचा उल्लेख. एका प्रसंगात श्रद्धाच्या पात्राच्या पारंपरिक पेहरावावर प्रश्न उपस्थित केला जातो. “कोणत्या शतकाचे कपडे परिधान करून येते ही बाई?” असा प्रश्न विचारला जातो. त्यावर उत्तर मिळतं, “नऊवारी म्हणतात याला… हे फक्त कपडे नाहीत, अभिमान आहे. हे मराठी साडीचा सन्मान आहे आणि मराठी आईची ओळख आहे.” या संवादातून मराठी संस्कृती आणि पारंपरिक नऊवारी साडीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे.

श्रद्धा कपूर साकारणार विठाबाई नारायणगावकरांची भूमिका

‘ईठा’ या चित्रपटात श्रद्धा कपूर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘तमाशा सम्राज्ञी’ म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, कलेप्रती असलेली निष्ठा आणि यशाचा प्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धाच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. अनेकांनी तिच्या पुनरागमनाचं स्वागत केलं आहे. काही चाहत्यांनी हा चित्रपट दमदार ठरणार असल्याची प्रतिक्रिया दिली, तर काहींनी श्रद्धाचा हा आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स ठरू शकतो, असं म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us