
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. त्यात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी लग्न करता सिंगल राहण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर सरोगसीद्वारे ते मुलांचे पालकही झाले आहेत. अशीच एक सेलिब्रिटी आहे जी 50 व्या वर्षीही अविवाहित आहे. पण तेही वडिलांच्या एका अटीमुळे. होय वडिलांच्या एका अटीमुळे बॉलिवूड सेलिब्रिटी आजही अविवाहितच आहे.
मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव
ही सेलिब्रिटी म्हणजे टीव्हीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर. 7 जून रोजी ती आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोठ्या पडद्यापासून ते छोट्या पडद्यापर्यंत, एकता कपूर हे मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक मालिकांचे निर्मिती-दिग्दर्शन केले आहे. याशिवाय, तिने बॉलिवूडमधील अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मितीही केली आहे.
50 व्या वर्षीही अविवाहित आहे
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एकता कपूर वयाच्या 50 व्या वर्षीही अविवाहित आहे. एका मुलाखतीदरम्यान एकता कपूरने तिने लग्न का केले नाही याचा खुलासा केला होता. एकता कपूर म्हणाली होती की, एकदा तिच्या वडिलांनी तिला सांगितले होते की, एकतर लग्न कर किंवा काम कर, तुला या दोघांपैकी एकच निवडावे लागेल. मी काम निवडलं.
एकतर कोणाशी तरी लग्न कर…
एकता कपूरने लग्न का केले नाही, हा प्रश्न चाहते सोशल मीडियावर नेहमीच विचारतात. खरे तर तिला वयाच्या 15 व्या वर्षीच लग्न करायचे होते. पण तिचे वडील जितेंद्र यांनी एकदा तिला एक अशी अट घातली कि तिचे आयुष्यच बदलून गेले. एकता कपूरला लहानपणापासूनच पार्ट्या करणे आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरणे खूप आवडायचे. यावर तिचे वडील जितेंद्र चिडले होते. त्यांनी तिला सांगितले की, एकतर कोणाशी तरी लग्न कर, नाहीतर सगळं सोडून पार्ट्या कर, किंवा मग करिअर बनव.
सरोगसीद्वारे आई बनली
जितेंद्र यांचे हे बोलणे एकता कपूरच्या मनाला खूप लागले. त्यानंतर तिने सर्व काही सोडून आपल्या कामाशीच लग्न केले. ती तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये इतकी व्यस्त झाली की, लग्नाचे वय कधी निघून गेले, याची तिला चिंताच राहिली नाही. एकता कपूर आता 50 वर्षांची झाली आहे. तिने लग्न केले नसले, तरी ती एका मुलीची आई आहे. 27 जानेवारी 2019 रोजी ती सरोगसीद्वारे आई बनली. तिला एक मुलगी आहे, जी तिच्यावर खूप प्रेम करते.