AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AJit Pawar : या महापालिकेत एकत्र लढायचं का? काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन, VIDEO

AJit Pawar : "मधल्याकाळात आमचं ठरलेलं. आम्ही मित्रपक्ष आहोत. एकमेकाचे उमेदवार, माजी पदाधिकारी, घ्यायचे नाहीत. पण ते घेतले गेले. मुंबईत गेल्यावर यावर चर्चा करु" असं अजित पवार म्हणाले.

AJit Pawar : या महापालिकेत एकत्र लढायचं का? काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन, VIDEO
Ajit Pawar
| Updated on: Dec 22, 2025 | 11:33 AM
Share

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवू शकतात का? याची चाचपणी काँग्रेसने सुरु केली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार यांना फोन केला होता. सूत्रांनी ही माहिती दिली. महायुती एकत्र असली, तरी पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप असा सामना होऊ शकतो. कारण पुणे महापालिकेत अजित पवार यांची सुद्धा ताकद आहे. पुणे महापालिकेत सगळ्या जागा लढवणार की युती होणार? “मध्यंतरी मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमात एकत्र आलो होतो. मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सूतोवाच केलेलं आहे. मागची 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतोय. दोन्ही शहरांनी मनापासून साथ दिलेली आहे. यावेळी बऱ्यापैकी नगराध्यक्षपदाचे निकाल आले. लोकांनी साथ दिली. इथं मी चाचपणी करतोय” असं अजित पवार म्हणाले.

“मधल्याकाळात आमचं ठरलेलं. आम्ही मित्रपक्ष आहोत. एकमेकाचे उमेदवार, माजी पदाधिकारी, घ्यायचे नाहीत. पण ते घेतले गेले. मुंबईत गेल्यावर यावर चर्चा करु” असं अजित पवार म्हणाले. “एकतर 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्या पक्षातले जे मूळ उमेदवार वाट पाहत होते उमेदवारी मिळेल. आता दुसर्‍या पक्षातले लोक घेतले की ते नाराज होणार. संधी शोधण्याचा प्रयत्न करणार. चारही प्रभागात ताकदीचे उमेदवार उभे करता यावेत हाच सर्व पक्षांचा प्रयत्न राहील” असं अजित पवार म्हणाले.

कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे

“आम्ही महाविकास आघाडीत 15 वर्ष काँग्रेस बरोबर काम करत होतो. आघाडी करण्याचा अधिकार त्या-त्या जिल्हाप्रमुखावर सोडला आहे. नगरपालिका निवडणुकीत कशा पद्धतीने युत्या झाल्या ते आपण सर्वा्ंनी पाहिलेलं आहे. निकाल लागलेले आहेत. प्रत्येक पक्ष महायुती सरकारमध्ये काम करत असला तरी, भाजपा, शिवसेना आम्ही राष्ट्रवादीचा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असेल” असं अजित पवार म्हणाले. “शेवटी आम्ही सगळ्यांच्या मदतीमुळे 288 मतदारसंघात लढलो. 238 मतदारसंघात जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं. त्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. नगरपालिकेला अनेक ठिकाणी विरोधात लढलो. राजकीय परस्थिती उदभवते तसे निर्णय जिल्हाप्रमुखांनी घेतले” असं अजित पवार म्हणाले.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.