Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला झाला स्वाइन फ्लू, तब्येतीबद्दल मोठी अपडेट समोर

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मी सध्या 'आवारापन 2'मध्ये दिसतोय. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून गल्लाही चांगला कमावला आहे. याच यशादरम्यान इम्रानच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला झाला स्वाइन फ्लू, तब्येतीबद्दल मोठी अपडेट समोर
Actor Emraan Hashmi
| Updated on: Aug 29, 2026 | 10:33 PM

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैक एक असलेला अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या त्याच्या ‘आवारापन 2’ चित्रपटाचं यश एन्जॉय करतोय. मात्र याचदरम्यान त्याच्या तब्येतीविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, इम्रान हाश्मीला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्याची H1N1 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. कामासंदर्भात बराच प्रवास त्याने केला, त्यावेळीच त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याने टेस्ट केली असता त्याचे रिपोर्टस पॉझिटिव्ह आले आहेत. त्याला बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

नक्की काय घडलं ?

Loading...

अभिनेता इमरान हाश्मी याला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगसाठी इम्रान नुकताच रांचीला गेला होता, मात्र रांचीहून परतल्यानंतर इम्रानला काही दिवसांपासून बरं वाटत नव्हतं. त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने चाचणी करून घेतली, त्याच्या चाचणीचा अहवाल काल समोर आला. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

इम्राने रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार सध्या तो विश्रांती घेत आहे. याबाबत अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

चाहत्यांची मागितली माफी

शनिवारी इम्रान हा बंगळुरूतील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावणार होता. चाहतेही त्याची उत्सुकतेने वाट पहात होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने त्याचा शो पोस्टपोन करण्यात आला. याबद्दल इम्रानने त्याच्या चाहत्यांची माफीही मागितली. इन्स्टाग्रामवर त्याने एक स्टोरी अपलोड केली. बरं वाटल्यावर लवकरच चाहत्यांना भेटेन, असंही त्याने लिहीलं.

इम्रानचा ‘आवारापन 2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी मोठ्या पडद्यावर रिलीज जाला, त्याला चांगलं यश मिळत आहे. 2007 साली आलेल्या ‘आवारापन’ चा हा सिक्वेल असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 ऑगस्ट 2026 ला रिलीज झालेला हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी करत असून कमाईही उत्तम केली आहे. बॉलीवुड हंगामा नुसार, या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा गल्ला कमावला आहे. या चित्रपटात दिशा पाटनी ही देखील प्रमुख भूमिकेत आहे. तसेच सुविंदर विक्की, विजयंत कोहली आणि पूरन गब्बी हेही चित्रपटात आहेत. नितीन कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपाटत इम्रान पुन्हा शिवम पंडित च्या भूमिकेत दिसलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us