“हो मी दारू प्यायले, आणि माझ्या मित्रांसोबत….” हेमा मालिनीची लेक इशा देओल ड्रग्ज अॅडिक्टेड?

ईशा देओलने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. त्याच वेळी, अभिनेत्रीने एक खुलासा केला की तिला ड्रग्ज अॅडिक्ट म्हणून लेबल का लावलं गेलं होतं ते.

हो मी दारू प्यायले, आणि माझ्या मित्रांसोबत.... हेमा मालिनीची लेक इशा देओल ड्रग्ज अॅडिक्टेड?
Esha Deol Denies Drug Addiction Rumors
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2025 | 1:29 PM

बॉलिवूड स्टार धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने 2002 बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिला ‘धूम’ आणि ‘ना तुम जानो ना हम’ सारख्या चित्रपटांमधून लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी ईशा देओल तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. पण आता तिच्यावरील एका आरोपामुळे चर्चेत आली आहे. कारण ईशाला ड्रग्ज अॅडिक्टेड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. याबाबत ईशाने स्वतः नुकताचं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

ईशा देओलवर ड्रग्ज अॅडिक्ट म्हणून लेबल लावण्यात आलं….

ईशाने अलीकडेच विक्रम भट्टच्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून पडद्यावर पुनरागमन केले आहे. राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीबाबात बोलताना तिच्यावर केलेल्या या आरोपावरूनही बोलली. ईशा म्हणाली की, “मी हे सांगू इच्छिते की मी ड्रग्जच्या विरोधात आहे आणि मी कधीही त्याला स्पर्शही केलेला नाही. जेव्हा ती ड्रग्ज व्यसनी असल्याबद्दलच्या बातम्या बाहेर आल्या होत्या तेव्हा मला खूप दुःख झाले आणि मी माझ्या आईला सांगितले की ती माझी ब्लड टेस्ट करू शकते.”

ईशा पुढे म्हणाली, “मी कधीही असे काहीही केले नाही ज्यामुळे माझ्या पालकांना लाज वाटेल. हो, मी पार्टी करायचे, माझ्या मित्रांसोबत काही पेये घ्यायचे, दारूही प्यायले आहे, मी मजा करायचे आणि का नाही? ते योग्य वय आणि वेळ होती. त्या वयात, प्रत्येकजण पार्टी करतो आणि पेये पितो. फक्त एकच मुद्दा होता की मीच लोकांच्या नजरेत होते.”


जेव्हा ईशाची तुलना तिच्या आईसोबत केली गेली तेव्हा….

ईशाने तिच्या आईशी असलेल्या तुलनेबद्दलही सांगितले आहे. ती म्हणाली, “माझे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि काही गोष्टी लिहिल्या जात होत्या त्यामुळे दबाव वाढत होत्या. मग मला वाटलं की ते माझ्या पहिल्या चित्रपटात माझी तुलना माझ्या आईशी करत आहेत, जिने 200 चित्रपट केले आहेत.”

ईशाचा गेल्या वर्षी भरत तख्तानीशी घटस्फोट झाला

भरत तख्तानीशी लग्न केल्यानंतर ईशा दोन मुलींची आई बनली. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी ईशा अनेक वर्षे चित्रपटांपासून दूर राहिली. तिने गेल्या वर्षी पती भरत तख्तानीपासून घटस्फोटाची घोषणा केली आणि यावर्षी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. तसेच तिच्यावर केले गेलेले ड्रग्ज अॅडीक्टेडचे आरोपही फेटाळून लावेल आहेत.