Rohman Shaul: सुष्मिता सेन व ललित मोदींच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने सोडले मौन , म्हणाला..

सुष्मिताच्या एक्स रोहमनसाठी ही बातमी अजिबात धक्कादायक नाही. पिंकव्हिलाशी बोलताना रोहमन शॉलने म्हटले आहे, त्यांना आनंदी राहू द्या. प्रेम सुंदर आहे. मला इतके माहित आहे की जर त्याने एखाद्याला निवडले असेल तर तो त्यास पात्र आहे. याशिवाय रोहमनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Rohman Shaul: सुष्मिता सेन व ललित मोदींच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने सोडले मौन , म्हणाला..
| Updated on: Jul 16, 2022 | 3:15 PM

बॉलिवूड अभिनेत्री माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने( Sushmita Sen) ललित मोदींसोबत नवे नाते सुरू केले आहे. ललित मोदींनी (Lalit Modi) सुष्मितासोबतच्या नात्याचा सोशल मीडियावर खुलासा करत ही माहिती दिली आहे. या खुलासाहोताच सोशल मीडियावर अनेक किस्से , मीम्स व्हायरल झालेत. बरेच लोक त्यांच्या नात्याबद्दल आनंदी दिसतात. तर दुसरीकडे त्याचवेळी,अनेक लोक याला मूर्खपणा म्हणत आहेत. मात्र या सगळ्यात सुश्मिता सेनाचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलची प्रतिक्रिया समोर आली आहे. रोहमन ललित मोदी आणि सुष्मिताच्या नात्यावर  एक्सबॉयफ्रेंड रोहमन शॉलची( Ex-boyfriend  Rohman Shaul)  प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाला रोहमन?

ललित मोदींनी सोशल मीडियावर आपल्या नात्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप यावर सुष्मिता सेनची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, दोघांची छायाचित्रे निश्चितपणे त्यांच्या मजबूत नात्याची साक्ष देतात. यावर सुष्मिता सेन कधी आणि काय बोलणार हे माहीत नाही. पण ललित मोदींसोबत सुष्मिताला एक्सबॉयफ्रेंड रोहमन शॉलने प्रतिक्रिया दिली आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या गोंडस फोटोंनी सर्वांनाच चकित केले आहे यात शंका नाही. पण सुष्मिताच्या एक्स रोहमनसाठी ही बातमी अजिबात धक्कादायक नाही. पिंकव्हिलाशी बोलताना रोहमन शॉलने म्हटले आहे, त्यांना आनंदी राहू द्या. प्रेम सुंदर आहे. मला इतके माहित आहे की जर त्याने एखाद्याला निवडले असेल तर तो त्यास पात्र आहे. याशिवाय रोहमनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये रोहमन लिहितो, एखाद्यावर हसून तुम्हाला आनंद मिळत असेल तर हसा, कारण त्रासलेला तुम्ही नाही.