Sushmita Sen and Lalit Modi | ललित मोदींच्या मुलाने वडिलांच्या अफेअरवर केले मोठे भाष्य, वाचा रुचिर मोदी नेमका काय म्हणाला

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर दोघांचे कुटुंबीयही प्रतिक्रिया देत आहेत. आता तर चक्क ललित मोदी यांचा मुलगा रुचिर मोदी यानेही यावर भाष्य करत सर्वानाच मोठा धक्का दिलायं. रुचिर म्हणाला की, मला माझे वडील आणि सुष्मिता सेन यांच्यातील नातेसंबंधांबद्दल अगोदरच माहिती होती.

Sushmita Sen and Lalit Modi | ललित मोदींच्या मुलाने वडिलांच्या अफेअरवर केले मोठे भाष्य, वाचा रुचिर मोदी नेमका काय म्हणाला
Image Credit source: Social media
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 16, 2022 | 11:15 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी चर्चेत आहेत. ललित मोदींनी गुरूवारी एक पोस्ट शेअर करत सर्वांना मोठा धक्काच दिला. सुष्मिता सेनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत बेटर हाफ असं ललित मोदी (Lalit Modi) यांनी म्हटले आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल दररोज प्रत्येकजण आपापले मत व्यक करत आहे. ललित मोदी यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टिका केली तर अनेकांनी त्यांना सपोर्ट (Support) देखील केला. आता या सर्व प्रकरणावर ललित मोदी यांच्या मुलाने देखील प्रतिक्रिया दिलीयं.

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या डेटिंगवर रूचिर म्हणाला…

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर दोघांचे कुटुंबीयही प्रतिक्रिया देत आहेत. आता तर चक्क ललित मोदी यांचा मुलगा रुचिर मोदी यानेही यावर भाष्य करत सर्वानाच मोठा धक्का दिलायं. रुचिर म्हणाला की, मला माझे वडील आणि सुष्मिता सेन यांच्यातील नातेसंबंधांबद्दल अगोदरच माहिती होती. परंतु या बाबतीत प्रत्येकाचे मत वेगळे आहे आणि घरातील इतर सदस्यांच्या मते आणि वैयक्तिक बाबींवर मला भाष्य करायला आवडत नाही.

हे सुद्धा वाचा

मला हे सर्व अगोदरच माहिती होते

घरातील धोरणानुसार, आम्ही एकमेकांच्या वैयक्तिक जीवनावर आणि विचारांवर भाष्य करत नाही किंवा मला याबद्दल करायचेही नाहीयं.  ललित मोदींच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या घरात ललित मोदींचा मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मुलाचे नाव रुचिर मोदी आहे तर मुलीचे नाव आलिया आहे. रुचिर वडिलांसोबत लंडनमध्ये राहतो. मुलीचे लग्न झाले आहे, परंतु ती आता एकटीच राहते आहे. ललित मोदीची पत्नी मिलन यांचे 2018 मध्ये निधन झाले. यासंदर्भात त्यांनी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें