Lata Mangeshkar : शरद पवार पंतप्रधान व्हावे, लतादिदींनी व्यक्त केलेली इच्छा-सोलापूरचे माजी महापौर

| Updated on: Feb 06, 2022 | 5:05 PM

भारतरत्न लता मंगेशकर(Lata Mangeshkar Death) यांनी वयाच्या नवव्या वर्षी सोलापूरमध्ये गीत गायले होते. वडील दिनानाथ मंगेशकर यांच्या समवेत सोलापूरला आल्यानंतर त्यांनी हे गीत गायले होते. त्यामुळेच सोलापूर महापालिकेच्यावतीने 1994 साली त्यांना मानपत्र देण्यात आले. अशी आठवण सोलापूरच्या माजी महापौरांनी सांगितली आहे.

Lata Mangeshkar : शरद पवार पंतप्रधान व्हावे, लतादिदींनी व्यक्त केलेली इच्छा-सोलापूरचे माजी महापौर
लता मंगेशकर यांना जी प्रतिष्ठा मिळाली ती त्यांच्या गायकीमुळे... लतादिदींनी चित्रपटांमध्ये सात दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं. त्यांनी हजारो गाणी गायली.
Follow us on

सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर : लतादिदींच्या (Lata Mangeshkar) जाण्याने आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांचा आवाज नेहमीच आपल्या कानावर तांच्या गाण्यांच्या माध्यमातून राहणार आहे. सध्या देशभरातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली (RIP lata mangeshkar) वाहण्यात येत आहे. भारतरत्न लता मंगेशकर(Lata Mangeshkar Death) यांनी वयाच्या नवव्या वर्षी सोलापूरमध्ये गीत गायले होते. वडील दिनानाथ मंगेशकर यांच्या समवेत सोलापूरला आल्यानंतर त्यांनी हे गीत गायले होते. त्यामुळेच सोलापूर महापालिकेच्यावतीने 1994 साली त्यांना मानपत्र देण्यात आले. अशी आठवण सोलापूरच्या माजी महापौरांनी सांगितली आहे. लतादीदीना सोलापुरात आणण्यासाठी सोलापूरचे तत्कालीन महापौर मनोहर सपाटे यांनी तब्बल 70 वेळा लतादिदींच्या बंगल्यावर गेले. त्यानंतर लतादिदिंनी सोलापूरला येण्याचे मान्य केले. याबाबत सोलापूर तत्कालीन महापौर मनोहर सपाटेंनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

शरद पवार पंतप्रधान होण्याची इच्छा

सोलापूरच्या माजी महापौरांनी लतादिलींच्या आठवणी सांगताना आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान व्हावे अशी इच्छा लतादिदिंनी सोलापुरात व्यक्त केली असल्याचेही त्यांनी सांगितलं. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या चर्चा वेळोवेळी राहिलेत. आता सोलापूरच्या माजी महापौरांनी सांगितलेल्या आठवणींना त्यांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर या वयाच्या नवव्या वर्षी आपल्या वडिलांसोबत सोलापूरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या भागवत चित्र मंदिर येथे गीत गायले होते. त्याबाबत सोलापुरातील भागवत चित्रमंदिराचे प्रमुख भरत भागवत यांनी त्या आठवणी सांगितल्यात. गाणं गाऊन लतादिदी वडिलांच्या मांडीवरच झोपल्याची आठवणही त्यांनी सांगितली आहे.

काही वेळातच होणार अंत्यसंस्कार

आज 6 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर 6.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि लतादीदींचं बहिण भावाचं नातं होतं. मोदी पंतप्रधान व्हावेत अशी जाहीर इच्छाही लतादीदींनी बोलून दाखवली होती. आज लतादीदींचं निधन झाल्याने मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लतादीदी यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिनाताई ठाकरे स्मृती मार्गापासून पार्कपर्यंत जाणारा रस्ता बॅरीकेटींग लावून बंद केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 वाजता छत्रपती शिवाजी पार्कवर दाखल होणार आहेत, याचसोबत आणखी काही व्हीव्हीआयपी व्यक्ती दाखल होणार असल्याने विशेष खबरदारी घेतली जातीये.

Lata Mangeshkar : फोटोग्राफर लता मंगेशकर आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, ‘असं’ होतं बहीणभावाचं नातं

Lata Mangeshkar : मुंबईतील या मार्गाने निघणार लतादिदींची अंत्ययात्रा, पंतप्रधान मोदी मुंबईत येणार

Lata Langeshakar : बालपणीची हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर, पहा दिदींचे कधीही न पाहिलेले फोटो