Video: मलायका अरोराने महेश भट्ट यांच्यासोबत केले रोमँटिक शूट? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचे सत्य

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मलायका अरोरा आणि महेश भट्ट यांचा रोमँटिक अंदाजातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खरा आहे की फेक आहे चला जाणून घेऊया...

Video: मलायका अरोराने महेश भट्ट यांच्यासोबत केले रोमँटिक शूट? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचे सत्य
Mahesh Bhatt and Malaika Arora
Image Credit source: Instagram/ Social Media
| Updated on: Feb 28, 2025 | 1:39 PM

वयाची ४०शी ओलांडल्यानंतरही बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसतात. मलायका ही बॉलिवूडमधील अतिशय फिट अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे. सध्या मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिचा दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सर्वत्र खळबळ माजली आहे. पण या व्हिडीओमध्ये दिसणारी खरच मलायका आहे की हा व्हिडीओ एडिटेड आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काय आहे व्हिडीओ?

मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाला. त्यानंतर दोघेही कठीण काळातून जात असल्याचे समोर आले होते. मलायका आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत फिरायला गेल्याचे दिसत होते. तर अर्जुन हा सोशल मीडियापासून काही दिवस लांब होता. आता मलायकाचा महेश भट्ट यांच्यासोबतचा बेडरुममधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मलायका महेश भट्ट यांना मिठी मारताना दिसत आहे. त्यानंतर ती बेडवर एका अजगरासोबत झोपलेली दिसत आहे. एका सीनमध्ये महेश भट्ट आणि मलायकाने एकाच रंगाचे कपडे घातल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी मलायका आणि महेश भट्ट एक रोमॅन्टिक व्हिडीओ अल्बम शूट करत आहेत असेही म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य काय?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मलायका आणि महेश भट्ट यांचा व्हिडीओ हा फेक आहे. हा व्हिडीओ पूर्णपणे एडिट करण्यात आलेला आहे. कदाचित एआय या फिचरची मदत घेऊन हा व्हिडीओ बनवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. असे असूनही अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.