
Faisal Khan on Aamir Khan : अभिनेता आमिर खान याचा भाऊ फैजल खान पुन्हा चर्चेत आला आहे. फैजल याने पुन्हा आमिर आणि कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहे. सांगायचं झालं तर, फैजल याने कुटुंबियांसोबत असलेले सर्व संबंध मोडले आहेत. पण फैजल सतत कुटुंबियांवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. आता देखील फैजल याने त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, फैजल याने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेला’ सिनेमात आमिर खान याच्यासोबत काम केलं. त्यानंतर तो पुन्हाकधी लाईमलाईटमध्ये आलाच नाही… आता त्याने पत्रकार परिषदेत दावा केला आहे की त्याच्यावर त्याच्या मावशीशी लग्न करण्यासाठी दबाव आणला गेला होता.
फैसल खानने असा दावा केला की त्याच्या कुटुंबाने त्याच्यावर मानसिक दबाव आणला होता. त्याने आमिर खानवर धमकी देण्याचा आरोप केला आहे. मावशीशी लग्न करण्यासाठी दबाव आणल्याचाही आरोप फैजल याने केला आहे. फैजल म्हणाला, ‘आमिरने मला चुकीच्या पद्धतीने पकडलं होतं. पोलिसांसोबत आमिर माझ्या घरी आला. खरंतर ते घर आमिर याचं आहे. ‘
‘आमिर खान याने सांगितलं की जर तू मानसोपचारतज्ज्ञाकडे गेला नाही तर दुसऱ्या खोलीत एक डॉक्टर आहे जो तुला इंजेक्शन देईल आणि बेशुद्ध करेल. तुला जबरदस्तीने मानसिक तपासणीसाठी नेलं जाईल. मला मोठा धक्का बसला होता.मी आमिरला असेही सांगितलं की जर हे करायचेच असतं तर मी सहज सहमती दर्शविली असती. ‘
फैजल खान पुढे म्हणाला, ‘मी आमिरसोबत नर्सिंग होममध्ये गेलो… माझा फोन देखील त्यांनी घेतला. मला प्रत्येक गोष्ट सहन करावी लागली. मी त्या दिवशीही म्हटलं होतं की, असा एक दिवस येईल जेव्हा मुंगीही हत्तीला मारेल.’ यासोबतच, त्याने त्याच्या आईवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर त्याच्या मावशीशी लग्न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही केला.’
फैजलने दावा केला की, ‘मावशीसोबत लग्न करण्याचा माझ्यावर तबाव होती. मावशी म्हणजे माझ्या आईती चूलत बहीण. मला हे लग्न करायचं नव्हतं. मी माझ्या कामात असायचो. मला मावशीसोबत लग्न करण्याची जराही इच्छा नव्हती. पण माझ्यावर सतत दबाव आणला जात होता. अशात मी कुटुंबियांपासून दूर राहू लागलो. घरात त्याच विषयावरुन सतत भांडणं होत होती. माझी आई सुद्धा माझ्यावर नाराज होती… कारण मी मावशीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता.’