Kangana Ranaut : यात काय चुकीचं आहे? कंगना रणौतबद्दल चांगलं बोलली म्हणून दक्षिणेतली प्रसिद्ध अभिनेत्री ट्रोल

Kangana Ranaut : "मला माहित नाही, मी त्या विषयाकडे का वळले?. माझ्या मनात तो विचार आला, कारण फक्त मोठ्या नावांसोबत काम करणं महत्वाचं नाहीय. त्यांच्याकडून आपण काय शिकतो हे सुद्धा महत्वाचं आहे"

Kangana Ranaut : यात काय चुकीचं आहे? कंगना रणौतबद्दल चांगलं बोलली म्हणून दक्षिणेतली प्रसिद्ध अभिनेत्री ट्रोल
aishwarya lekshmi- kangana ranaut
| Updated on: Jul 27, 2026 | 8:28 PM

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीला अभिनेत्री कंगना राणौतबद्दल मोकळेपणाने बोलणं चांगलचं महाग पडतय. ‘गट्टा कुश्ती 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीने मुलाखत दिली होती. त्यावेळी ती कंगना राणौत बद्दल बोलली होती. आता महिन्याभराने ऐश्वर्याची ती क्लिप पुन्हा व्हायरल झाली आहे.ऐश्वर्या लक्ष्मीने ती कंगना राणौतची मोठी चाहती असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ऐश्वर्याच्या या मताबद्दल इंटरनेटवर दोन मतप्रवाह आहेत. ऐश्वर्या लक्ष्मीने जून महिन्यात गल्लता प्लसला मुलाखत दिली. त्यावेळी स्वत:च्या करिअरबद्दल बोलताना ऐश्वर्याने कंगनाबद्दल सुद्धा बोलली.

“मला आता पटकन कंगना बोललेली ते आठवलं. मला कंगना आवडते. मला असं वाटतं की, ती मॅड जिनियस म्हणजे प्रतिभावंत आहे पण थोडी फटकळ आहे. चांगलं बोलण्यासाठी तिने स्वत:ला कसं तयार केलय ते मला आवडतं. ती एक चांगली वक्ता आहे. संसदेत ती जी भाषणं देते ती मला आवडतात. मी तिची खूप मोठी चाहती आहे” असं ऐश्वर्या लक्ष्मी म्हणालेली.

आपण काय शिकतो हे सुद्धा महत्वाचं आहे

“मला माहित नाही, मी त्या विषयाकडे का वळले?. माझ्या मनात तो विचार आला, कारण फक्त मोठ्या नावांसोबत काम करणं महत्वाचं नाहीय. त्यांच्याकडून आपण काय शिकतो हे सुद्धा महत्वाचं आहे” असं ऐश्वर्या लक्ष्मी म्हणालेली. ऐश्वर्या लक्ष्मीची ती क्लिप पुन्हा एकदा व्हायरल होतेय. इंटरनेटवर त्या बद्दल वेगवेगळी ठाम मतं आहेत. काही युजर्सनी ऐश्वर्या लक्ष्मीवर टीका केली आहे. एका युजरने लिहिलय मला ऐश्वर्या लक्ष्मीची मतं आवडतात. पण हे मत नाही पटलं. एकाने लिहिलय कदाचित ती कंगनाच्या पावलावर पाऊल टाकणार असेल.

कमेंट करणाऱ्यांची मतं काय?

कंगनाचे चाहते तिच्या बचावासाठी पुढे आले आहेत. आपल्याला एखादा कलाकार आवडणं यात काय चुकीचं आहे?. कंगनाचे सुरुवातीचे चित्रपट खूप चांगले होते असं एका एक्स युजरने लिहिलय. ती खरचं प्रतिभावान आहे. बॉलिवूडमधील ती एक चांगली अभिनेत्री आहे अशी एका फॅनने कमेंट केलीय. एकाने विचारलय प्रॉब्लेम काय आहे? ऐश्वर्या फक्त कंगनाच्या भाषणांबद्दल बोलत होती, तिच्या राजकीय भूमिकांबद्दल ती बोलली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us