Ask SRK: चाहत्याने शाहरुखकडे मागितला OTP; किंग खानने दिलं भन्नाट उत्तर

ट्विटरवर शाहरुखकडे चाहत्याने मागितला OTP; किंग खानचं उत्तर व्हायरल, म्हणाला 'बेटा मी इतका..'

Ask SRK: चाहत्याने शाहरुखकडे मागितला OTP; किंग खानने दिलं भन्नाट उत्तर
'पठाण' सिनेमासाठी Shah Rukh Khan ने किती घेतलं मानधन? अभिनेत्याच्या ट्विटमुळे सत्य उघड
| Updated on: Jan 05, 2023 | 7:41 AM

मुंबई: बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटावरून बराच वाद सुरू आहे. या वादादरम्यान शाहरुखने ट्विटरवर #AskSRK सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी शाहरुखला विविध प्रश्न विचारले. किंग खानने दिलेली उत्तरं सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.

#AskSRK सेशनदरम्यान हजारो चाहत्यांनी शाहरुखला प्रश्न विचारले. त्यापैकी काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्याने आपल्याच खास अंदाजात दिली. एकाने शाहरुखला विचारलं, ‘ सर, एक ओटीपी आला असेल, जरा मला सांगा.’ यावर किंग खानने दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही हसू येईल.

शाहरुखने काय दिलं उत्तर?

ओटीपी विचारणाऱ्या चाहत्याला शाहरुख म्हणाला, ‘बेटा, मी इतका प्रसिद्ध आहे की मला OTP नाही येत. जेव्हा मी ऑर्डर देतो तेव्हा वेंडर्स मला थेट सामान पाठवतात. तुम्ही तुमचं बघून घ्या.’

शाहरुख कोणाकडून प्रेरणा घेतो?

#AskSRK सेशनदरम्यान शाहरुखने दिलेली इतरही काही उत्तरं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तू कोणाकडून प्रेरणा घेतो, असं एका चाहत्याने त्याला विचारलं. यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘मी याआधीही हे सांगितलं आहे की मी सर्वसामान्य लोकांपासून प्रेरणा घेतो, यशस्वी लोकांकडून नाही. सामान्य असणंच खास आहे.’

शाहरुखला ट्विटरवर येऊन 13 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्याने #AskSRK सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. नेहमीप्रमाणे या देशांमध्ये त्याने दिलेली उत्तरं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.