
मुंबई : उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला खरी ओळख ही बिग बाॅसच्या घरातून मिळालीये. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा होती की, एकता कपूर हिच्या चित्रपटाच्या माध्यमातून उर्फी जावेद ही बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. उर्फी जावेद ही एकता कपूर हिच्या चित्रपटामध्ये (Movie) मुख्य भूमिकेत आहे, अशी चर्चा होती. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते.
आता नुकताच उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. उर्फी जावेद या व्हिडीओमध्ये अत्यंत हटके लूकमध्ये दिसत आहे. आता उर्फी जावेद हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे उर्फी जावेद ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आलीये.
उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चक्क आयुष्मान खुराना याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे प्रमोशन करताना उर्फी जावेद ही दिसत आहे. दिल का टेलीफोन ड्रेस उर्फी जावेद हिने घातल्याचे दिसत आहे. आता चाहते हे उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत.
उर्फी जावेद हिचा हा लूक अतरंगी दिसत आहे. मात्र, एकता कपूर हिच्या चित्रपटाचेच प्रमोशन उर्फी जावेद ही करताना दिसत आहे. उर्फी जावेद एकता कपूर हिच्या लव, सेक्स और धोखा 2 या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच जोरदार रंगली होती आणि आता एकताच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना उर्फी दिसलीये.
रिपोर्टनुसार लव, सेक्स और धोखा 2 या चित्रपटाची उर्फी जावेद हिने होकार दिल्याचे देखील कळत आहे. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने पापाराझी यांना खास बॅंग गिफ्ट केल्या आहेत. याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर अनेकांनी उर्फी जावेद हिचे काैतुक देखील केले होते.