शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांना पान मसाला जाहिरातीबाबत FDAने नोटीस पाठवली. यामागे नेमकं कारण काय आणि शाहरुखचा त्यावर काय रिप्लाय आला, हे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. काय आहे संपूर्ण प्रकरण ?

शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
Actor Shah Rukh Khan
| Updated on: Aug 26, 2026 | 7:44 PM

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवायाची राज्यभरात चर्चा असून अनेकांचं धाबं दणाणलं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एफडीएकडून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) , अजय देवगण (Ajay Devgn) आणि टायगर श्रॉफ यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. या तिघांनी मिळून केलेल्या ‘विमल इलायची’ची जाहिरात केली होती, त्याचसंदर्भात ही नोटीस असून या तिघांनाही कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख कान पुन्हा चर्चेच आला होता. याच प्रकरणी आता अन्न व औषध प्रशासनाचे कमिश्नर तुकाराम मुंढे (Tukram Mundhe) यांनी मौन सोडलं असून या नोटीशीवर शाहरुखचा काय रिप्लाय आला तेही त्यांनी सांगितलं.

 शाहरुखचा रिप्लाय काय ?

या जाहिरातीप्रकरणी पाठवण्यात आलेल्या नोटीशीला शाहरुख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांच्याकडून अद्याप काहीही रिप्लाय आलेला नाही. शाहरुख खानकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नााही, असं एफडीएचे किम्शनर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. ज्या तीन अभिनेत्यांना या जाहिरातीसंबंधी नोटीस पाठवण्यात आली होती, त्यांच्यापैकी कोणाचाही अजून रिप्लाय किंवा उत्तर आलेलं नाही, असं मुंढे यांनी एका न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितलं.

नियमांच्या उल्लंघनावर नजर

एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे हे चुकीचे नाही; मात्र त्या उत्पादनाचा चुकीच्या किंवा नियमबाह्य पद्धतीने प्रचार करणे चुकीचे आहे असं तुकाराम मुंढे म्हणाले.

कमर्शियल आणि सरोगेट जाहिरातींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तुकाराम मुंढे पुढे म्हणाले की, “आपण ज्या काही जाहिराती पाहतो, मग त्या वर्तमानपत्रांमध्ये असोत, टीव्हीवर असोत किंवा सोशल मीडियावर , त्या सर्वांवर आमची नजर आहे. जाहिरातींच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन होत आहे का, यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.” असं त्यांनी नमूद केलं.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्र FDAने विमल इलायचीच्या जाहिरातीची गंभीर दखल घेत तिच्या स्वरूपाबाबत चौकशी सुरू केली आहे. ‘विमल’ हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडला जात असल्याने, त्याच नावाने करण्यात येणाऱ्या इलायचीच्या जाहिरातीमुळे ग्राहकांना पान मसाल्याच्या ब्रँडची आठवण येऊ शकते, असा युक्तिवाद FDAने केला होता. त्यामुळे ही जाहिरात सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, याची चौकशी FDAकडून सुरू करण्यात आली.

 

 

Follow Us