एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘दया नायक’ यांच्या जीवनावर येणार चित्रपट, राम गोपाल वर्मा यांची घोषणा

राम गोपाल वर्मा यांनी हर्षवर्धन राणे अभिनीत आपल्या नवीन हिंदी चित्रपटाची घोषणा केली असून, त्यांनी या चित्रपटाची कथाही देखील उघड केली आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या जीवनावर येणार चित्रपट, राम गोपाल वर्मा यांची घोषणा
Ram Gopal Varma
| Updated on: Aug 10, 2026 | 10:49 PM

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूडला अंडरवर्ल्डवर आधारित अनेक चित्रपट दिले आहेत. यात सत्या, कंपनी, डी, सरकार यासारखे अनेक चित्रपट दिले आहेत. ज्यांना चाहत्यांनी पसंदी दिली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून राम गोपाल वर्मा इंडस्ट्रीपासून दूर आहेत. त्यांची जादू आता संपल्यासारखी म्हटली जात आहे. मात्र, आता राम गोपाळ वर्मा कम बॅकची तयारी केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता हर्षवर्धन राणे यांच्यासोबत ‘पुलिस कंपनी’ नावाचा चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘दया नायक’ यांच्या जीवनावर बेतलेला आहे.

राम गोपाल वर्मा यांनी एक्स पोस्टवर या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट टी-सिरीज प्रोड्यूस करणार आहे. आपला हा चित्रपट डी, कंपनी याहून जास्त खतरनाक असणार असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे.

RGV ने आपल्या ट्वीटमध्ये चित्रपटाच्या प्लॉटचा देखील खुलासा केला आहे. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगशी संबंधित कहाणीवर आधारित असणार आहे. दाऊद इब्राहिमने आपल्या बहुतांशी शत्रू गँगचा खात्मा केला, आणि त्याच्या गँगला एका कंपनीचे स्वरुप दिले. त्यानंतर तो दुबईला गेला आणि त्याचा खास माणूस छोटा राजन याच्याकडे डी-कंपनीकडे सर्व कामकाज सांभाळण्याची जबाबदारी दिली.

या घटनेनंतर एका दाऊद आणि छोटा राजन याच्यात फूट पडली. दोघांनी नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये एका रिकामेपण निर्माण झाले. या संधीचा फायदा उचलत दुसऱ्या गँगनी आपला दबदबा कायम करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे मुंबईतील गुन्हेगारी वाढली. परिस्थिती इतकी बिघडली की पोलिस आणि प्रशासनाने या गँगच्या कारवायांना रोखणे कठीण झाले.

राम गोपाल वर्मा पुढे लिहितात की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यातूनही मोठ्या संख्येने तरुण अंडरवर्ल्डच्या या कंपन्यांचा एक हिस्सा बनण्यासाठी मुंबईत येऊ लागले. परिस्थिती बेकाबू होताना पाहून एक स्पेशल पोलिस स्क्वाड बनवण्यात आले. साल १९९७ ते २००४ च्या दरम्यान या स्क्वाडने ३०० हून जास्त गँगस्टर्सचा खात्मा केला.

हर्षवर्धन राणे करणार भूमिका

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितले की हा चित्रपट पुलिस कंपनी या स्पेशल स्क्वाडशी प्रेरित आहे. चित्रपटाची कहाणी स्क्वाडचे एक सदस्य दया नायक यांच्या जीवनावर आधारित आहे. हे कॅरेक्टर हर्षवर्धन राणे साकारत आहे. चित्रपटात अनेक मोठे कलाकार असणार असून उर्वरित कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us