Sunny Deol | ‘लाज वाटते…’, बॉलिवूड अभिनेते असं करतात तरी काय, ज्यामुळे सनी देओल यांना वाटते लाज?

'इंडस्ट्रीमध्ये अभिनय करण्यासाठी आलात की...', बॉलिवूड अभिनेते करत असलेल्या 'त्या' गोष्टीवर सनी देओल यांच्याकडून नाराजी व्यक्त

Sunny Deol | लाज वाटते..., बॉलिवूड अभिनेते असं करतात तरी काय, ज्यामुळे सनी देओल यांना वाटते लाज?
Sunny Deol
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 07, 2023 | 10:01 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेते सनी देओल कायम त्यांना खटकणाऱ्या मुद्द्यांवर बोलताना दिसतात. आता देखील सनी देओल यांनी बॉडी शेव करणाऱ्या अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सनी देओल यांनी बॉडी शेव करणाऱ्या अभिनेत्यांविरोधात एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ‘गरद २’ फेम अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. ‘इंडस्ट्रीमध्ये अभिनय करण्यासाठी आलात की बॉडीबिल्डिंग करण्यासाठी?’ असा प्रश्न देखील सनी देओल यांनी यावेळी उपस्थित केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी देओल यांची चर्चा सुरु आहे,

बॉडी शेव करणाऱ्या अभिनेत्यांबद्दल सनी देओल म्हणाले, ‘बॉडी शेव केल्यानंतर अभिनेत्यांना वाटतं की, ते स्टार झाले आहेत. पण पण मला असं काही करायला प्रचंड लाज लाटते. बॉडी शेव केल्यानंतर मला मुलगी झाल्यासारखं वाटतं. आयुष्यात मी कधीही सिक्स पॅक एब्स बनवण्याचा विचार देखील केला नाही…’

 

 

पुढे सनी देओल म्हणाले, ‘मला असं वाटतं बॉडी शेव करायला आपण अभिनेते आहोत, बॉडी-बिल्डर नाही. आपण इंडस्ट्रीमध्ये अभिनय करण्यासाठी आलो आहोत, बॉडी बिल्डिंग करण्यासाठी नाही…’ असं देखील सनी देओल नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाले आहेत. सध्या सर्वत्र सनी देओल आणि त्यांच्या आगामी सिनेमची चर्चा सुरु आहे.

सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल लवकरच ‘गरद २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सध्या सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाची टीम प्रमोशनसाठी वाघा वॉर्डरवर देखील पोहोचली होती. दरम्यान, त्यांनी वाघा बॉर्डरवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा…’ असे नारे देखील लावले. वाघा बॉर्डर येथे सिनेमाच्या टीमने घालवलेल्या क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

११ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होणार असल्यामुळे सनी देओल सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. तब्बल २२ वर्षांनंतर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ११ ऑगस्ट रोजी सनी देओल याच्या ‘गदर २’ सिनेमासोबत, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.