Gadar 2 Success Party | ‘गदर 2’च्या पार्टीत कार्तिक-सारा एकत्र; दोघांनी मिठी मारताच मधे आली क्रिती अन्..

'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं. पार्टीतून निघताना दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Gadar 2 Success Party | गदर 2च्या पार्टीत कार्तिक-सारा एकत्र; दोघांनी मिठी मारताच मधे आली क्रिती अन्..
कार्तिक आर्यन, सारा अली खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2023 | 9:34 AM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : ‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर शनिवारी मुंबईत एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ‘गदर 2’च्या पार्टीत बऱ्याच सेलिब्रिटींमधील कटुता दूर झाली आणि ते एकमेकांसोबत दिसले. सर्वात आधी शाहरुख खान आणि सनी देओल यांनी पापाराझींसमोर एकत्र फोटो क्लिक केले. या दोघांनी जवळपास 16 वर्षे एकमेकांशी अबोला धरला होता. हा वाद अखेर मिटला आहे. त्यानंतर कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. कार्तिक आणि सारा एकेकाळी एकमेकांना डेट करायचे, हे सर्वश्रुत आहे. आता ‘गदर 2’च्या पार्टीत दोघांना एकमेकांना मिठी मारताना पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कार्तिक-साराची भेट

या पार्टीला साराने तिचा भाऊ इब्राहिमसोबत हजेरी लावली होती. सुरुवातीला कार्तिक आणि सलमान खान यांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिले. त्यानंतर पुढे गेल्यावर साराने सलमानची भेट घेत त्याला मिठी मारली. त्याच्याच बाजूला कार्तिक उभा होता. कार्तिकनेही पुढाकार घेत साराला मिठी मारली. दोघांच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय पार्टीतून निघताना पुन्हा एकदा कार्तिक-सारा एकत्र आले. मात्र यावेळी दोघांसोबत अभिनेत्री क्रिती सनॉनसुद्धा होती.

पहा व्हिडीओ

कार्तिक-साराने मारली मिठी

पार्टीतून बाहेर पडल्यावर आधी साराने क्रितीला मिठी मारत तिचा निरोप घेतला. त्यानंतर क्रितीच्याच पुढे उभा असलेल्या कार्तिकला तिने पुन्हा मिठी मारली. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कार्तिक आणि साराने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी इच्छा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी क्रिती सनॉनवरूनही कमेंट केली आहे. कार्तिक आणि साराला पुन्हा एका चित्रपटासाठी एकत्र साइन करा, म्हणजे ती दोघं एकमेकांना डेट करू लागतील, असंही काहींनी म्हटलंय.

ब्रेकअप आणि पॅचअप

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानने ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या शोमध्ये या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. या वर्षी जानेवारी महिन्यात कार्तिक आणि साराने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लंडन व्हेकेशनचे फोटो पोस्ट करताच पुन्हा पॅच-अप झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्येही उदयपूरमधील दोघांचा फोटो व्हायरल झाला होता.