AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 Success Party | 16 वर्षांचा वाद अखेर मिटलाच; शाहरुख खान-सनी देओल पुन्हा एकत्र

जवळपास 16 वर्षांचा वाद अखेर मिटला आहे. सनी देओल आणि शाहरुख खान हे 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत एकत्र आले आणि दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझसुद्धा दिले. 'डर' या चित्रपटानंतर दोघांमध्ये शीतयुद्ध निर्माण झालं होतं.

Gadar 2 Success Party | 16 वर्षांचा वाद अखेर मिटलाच; शाहरुख खान-सनी देओल पुन्हा एकत्र
Shah Rukh Khan and Sunny DeolImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2023 | 9:01 AM
Share

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यात गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. ‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. त्याआधी शाहरुखने सनी देओलच्या ‘गदर 2’ला शुभेच्छा देण्यासाठी ट्विटसुद्धा केलं होतं. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ हा चित्रपट लवकरच कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार आहे. तर आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले आहेत. यानिमित्त शनिवारी मुंबईत ‘गदर 2’च्या टीमकडून सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आमिर खान, कार्तिक आर्यन, सलमान खान, शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, विकी कौशल, राजकुमार राव यांसह बॉलिवूडमधील असंख्य कलाकार या पार्टीला उपस्थित होते. मात्र या सर्वांत जेव्हा शाहरुख आणि सनी देओल यांनी एकत्र येऊन फोटोसाठी पोझ दिले, तेव्हा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.

‘गदर 2’च्या पार्टीत शाहरुखने पत्नी गौरीसोबत हजेरी लावली होती. यावेळी त्याने सनी देओलला शुभेच्छा दिल्या आणि दोघंजण बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले. त्यानंतर पापाराझींसाठी दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिले. या दोघांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे गेल्या 16 वर्षांपासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात खुद्द सनी देओलने याचा खुलासा केला होता. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या चित्रपटानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी उडाली होती.

यश चोप्रा यांचा ‘डर’ हा चित्रपट त्यावेळी तुफान गाजला होता. मात्र त्या चित्रपटातील शाहरुखने साकारलेल्या भूमिकेनं सर्व प्रसिद्धी आपल्याकडे खेचली होती. सनी देओलच्या भूमिकेपेक्षा शाहरुखचीच भूमिका वरचढ ठरली होती. “एका सीनबद्दल माझ्यात आणि यश चोप्रा यांच्यात बाचाबाची झाली होती. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो की मी चित्रपटात कमांडो ऑफिसरची भूमिका साकारतोय. शारीरिकदृष्ट्या ती भूमिका फार सक्षम होती, मग हा मुलगा मला कसा काय हरवू शकतो, असा सवाल मी त्यांना केला. त्यावेळी मी इतका चिडलो होतो की माझ्याच हाताने माझी पँट फाडल्याचं मला लक्षात आलं नाही”, असं सनी देओलने एका मुलाखतीत सांगितलं होतं. या चित्रपटानंतर जवळपास 16 वर्षे सनी देओल आणि शाहरुख खान एकमेकांशी बोलले नव्हते.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.