‘Shah Rukh Khan पेक्षा माझा मुलगा…’, आर्यन खान याच्याबद्दल गौरीचं मोठं वक्तव्य

आर्यन खान याच्याबद्दल असं काय म्हणाली गौरी खान.. ज्यामुळे शाहरुख खान याच्या चाहत्यांना बसेल धक्का..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौरी खान हिच्या वक्तव्याची चर्चा...

Shah Rukh Khan पेक्षा माझा मुलगा..., आर्यन खान याच्याबद्दल गौरीचं मोठं वक्तव्य
| Updated on: May 16, 2023 | 5:02 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत असतो. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाच्या यशामुळे शाहरुखच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील आहे… संपूर्ण जगात शाहरुख खान याच्या नावाची आणि अभिनेत्याची कामाची चर्चा आहे.. शाहरुख खान याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात… फक्त किंग खान याच्याबद्दलच नाही तर, अभिनेत्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. किंग खान याची पत्नी गौरी खान हिने एका पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे.. पुस्तकात गौरीने कुटुंबाबद्दल देखील लिहिलं आहे..

नुकताच, गौरी खान हिने लॉन्च झालेल्या पुस्तकाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.. पुस्तकातील सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे फॅमिली फोटो.. असं खुद्द गौरी खान हिने सांगितलं आहे. गौरी खान म्हणाली, ‘शाहरुख खानची डेट मिळणं सोप आहे, पण आर्यन खान याची डेट मिळणं फार कठीण आहे. शाहरुख याच्यापेक्षा आर्यन खान अधिक व्यस्त असतो..’

एवढंच नाही तर गौरी खान हिने Red Chillies office सोबत काम करणं किती कठीण होतं, यावर देखील मोठा खुलासा केला आहे.. गौरी खान म्हणाली, ‘शाहरुख खान याच्या पुढे जाणं प्रचंड कठीण आहे.. रेड चिलीज ऑफिसमधला हा माझा सगळ्यात कठीण प्रोजेक्ट होता हे मला आठवतंय. यामध्ये अनेक मुद्दे होते ज्यावर आम्हाला एकत्र काम करायचं होतं..’

तर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शाहरुख खान गौरीचं कौतुक करत म्हणाला, ‘कामाच्या ठिकाणी समाधानी  दिवसासाठी काय आवश्यक आहे हे आम्ही गौरीकडून शिकतो. गौरी, कुटुंबाला यशाचा मंत्र दिल्याबद्दल धन्यवाद…’ सध्या सर्वत्र गौरी खान हिच्या पुस्तकाची चर्चा सुरु आहे…

दरम्यान, गौरी सोशल मीडियावर कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, ‘कुटुंबामुळे घर बनतं…, पेंग्विनइंडिया कॉफी टेबल बुक पुस्तकासाठी उत्सुक आहे…’ असं लिहिलं आहे. गौरीच्या पोस्ट फक्त चाहत्यांनी नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

गौरीने पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करत शाहरुख खान म्हणाला, ‘यार गौरी तू किती उत्तम मुलांना घडवलं आहेस…’ सध्या अभिनेत्याच्या कमेंटची देखील तुफान चर्चा रंगत आहे. गौरी आणि शाहरुख यांनी तीन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव सुहाना खान असून मुलांचं नाव आर्यन आणि अबराम असं आहे.